इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ड्रग्ज माफिया ललित पाटीलसह रोहित चौधरी, झिशान शेख, हरिशपंत हे चौघे मुबई पोलिसांकडून नाशिक पोलिसांनी ताबा घेतला आहे. शुक्रवारी उच्चन्यायालयाच्या आदेशाने त्यांचा ताबा मिळाला आहे. मुंबई, पुणे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आता नाशिक पोलिस या प्रकरणाची चौकशी करणार आहे. ललित पाटील मुळ नाशिकचा रहिवासी असल्यामुळे अनेक जणांचे कनेक्शन चौकशीतून समोर येणार असल्यामुळे काहींचे धाबे दणाणले आहे.
शनिवारी या चौघांना येथील नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहेत. शिंदे गावात उभारण्यात आलेल्या एमडी पावडर व कच्चा मालाच्या गोदामाबाबत त्याच्याकडे पोलिसांकडून चौकशी केली जाऊ शकते. याअगोदरही नाशिकमध्ये मुंबई पोलिसांनी आणले व काही कळायच्या आतच त्याला मुंबईला घेऊन गेले होते. पण, आता या आरोपींचा ताबा नाशिक पोलिसांना मिळाल्यानंतर ते संपूर्ण चौकशी करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांनी त्याला शिंदे पळसे गावात आणले होते. त्यानंतर त्यांनी उपनगर येथे गेले होते. पण, यासह सर्वच ठिकाणी नाशिक पोलिस पुन्हा चौकशीसाठी ललित पाटील यांना घेऊन जाण्याची शक्यता आहे.
साकीनाका पोलिसांनी पहिले ३०० कोटीचे ड्रग्ज पकडले होते. त्यानंतर याप्रकरणात अनेक कनेक्शन समोर आले. याप्रकरणात अनेक अधिका-यावर कारवाई करण्यात आली आहे. ललित पाटील ससून रुग्णालयातून २ ऑक्टोंबरला फरार झाला होता. त्याने पळ काढल्यानंतर अनेक दिवस नाशिकमध्येच होता. त्याला कोणाचा राजकीय पाठींबा होता का? याचाही तपास केला जाणार आहे