नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -नाशिकमध्ये उद्यापासून (९ आणि १० डिसेंम्बर २३) दोन दिवसीय राज्यस्तरीय राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद २०२३चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत संपूर्ण महाराष्ट्रातून ३०० हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ही परिषद भारत सरकारच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागांतर्गत भरविली जाते. मात्र नाशिकमध्ये प्रथमच या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन केले आहेत.
सदर राज्यस्तरीय परिषदे साठी प्रमुख अतिथी म्हणून जलज शर्मा (जिल्हाधिकारी नाशिक), डॉ.अशीमा मित्तल (मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक), डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञ), डॉ. संदीप कर्णिक (पोलीस आयुक्त नाशिक) डॉ. सीताराम कोल्हे (सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक) , डॉ. अपूर्वा जाकडी (स्पेस एज्युकेशन नासा), डॉ. अश्विनी कुमार भारद्वाज ( सीईओ बेजॉन देसाई फाउंडेशन), (डॉ. नितीन बच्छाव ( शिक्षणाधिकारी नाशिक) तर दुसऱ्या दिवशी सांगता समारंभासाठी प्रा.संजीव सोनवणे , (कुलगुरू वाय.सी.एम.ओ.) , प्रवीण पाटील (शिक्षणाधिकारी माध्यमिक नाशिक), डॉ. कपिल आहेर उपसंचालक आरोग्य विभाग नाशिक) आदि मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप होईल…
बालवैज्ञानिकांचा या वैज्ञानिक महाकुंभ या कार्यक्रमाकरीता धनलक्ष्मी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय पाथर्डी फाटा नाशिक येथे आपण आपल्या परिवारासह उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रक सौ. ज्योती कोल्हे, व डॉ. प्रकाश कोल्हे यांनी केले आहेत.