शुक्रवार, सप्टेंबर 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

विधानसभा प्रश्नोत्तर: ऑनलाइन फसवणुकीबाबत आता ‘डायनॅमिक प्लॅटफॉर्म’… असे असेल नवीन अ‍ॅप..विधानसभेत घोषणा

by Gautam Sancheti
डिसेंबर 8, 2023 | 5:40 pm
in राज्य
0
crime11

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– राज्यामध्ये ॲप, संकेतस्थळे, विविध समाज माध्यम ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. यामध्ये बरेचसे ॲप विदेशातून संचालित करण्यात येत आहे. अशा ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी सर्वंकष असा ‘डायनॅमिक (गतिमान) प्लॅटफॉर्म’ तयार करण्यात येत आहे. या माध्यमातून जलद प्रतिसाद मिळण्याची व्यवस्था होणार आहे. ही सर्व व्यवस्था एका ॲपमध्ये असेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत अधिकची माहिती देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ए. एस. ट्रेडर्स व त्यांच्या अन्य कंपन्यांनी केलेल्या फसवणुकीबाबत दाखल गुन्ह्यांमध्ये वेगवेगळ्या राज्यांशी समन्वय करून तपास सुरू आहे. गुंतवणुकीचा पैसा विदेशात गेला असल्यास आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यान्वये अंमलबजावणी संचालनालयाची मदत घेण्यात येईल. या गुन्ह्यामध्ये पहिले दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर तपास पुढे जाईल त्यानुसार पुढील दोषारोप पत्रामध्ये आरोपींचा सहभाग वाढेल. याप्रकरणी संशयित आरोपींना विदेशात पळून जाण्यास कुठलीही मदत करण्यात आलेली नाही.

उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, याप्रकरणी आजस्थितीत तपासात एकूण ३५ आरोपी निष्पन्न झाले आहे. त्यापैकी १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. विदेशातून संचालित करण्यात येणाऱ्या ॲपच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करण्यात येत आहे. याबाबत केंद्र शासनही त्यांच्या आयटी कायद्यामध्ये बदल करत आहे. तसेच राज्य शासनाने ‘डायनॅमिक प्लॅटफॉर्म’ तयार करण्यासाठी निविदा काढल्या आहेत. त्याला अनेक जागतिक कंपन्यांचा प्रतिसादसुद्धा मिळाला आहे. आर्थिक फसवणुकीच्या गुणांवर आळा घालण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेत ‘फायनान्शिअल इंटेलिजन्स’ ची व्यवस्था करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात काही पोलीस परिक्षेत्र व आयुक्तालय अंतर्गतही व्यवस्था उभारण्यात येईल. त्यानंतर प्रतिसाद बघून व्यवस्थेचा विस्तार करण्यात येईल. आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मुख्य आरोपीसह अन्य सहभागी लोकांना सहआरोपी करण्यात येते. त्यामुळे कुणालाही सोडण्यात येत नाही.

ते पुढे म्हणाले की, लोकप्रतिनिधींसोबत अनेक नागरिक छायाचित्रे काढत असतात. त्याला लोकप्रतिनिधी विरोधही करू शकत नाहीत. राज्यात लोकप्रतिनिधींसोबत छायाचित्रे काढून फसवणूक करण्याचे प्रकारही वाढत आहेत. अशा प्रकारे लोकप्रतिनिधींसोबतचे छायाचित्र दाखवून पैसे मागितल्यास नागरिकांनी सहकार्य करू नये, असे आवाहन यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले. या चर्चेत विधानसभा सदस्य आशिष शेलार, जयंत पाटील, नाना पटोले, गणपत गायकवाड, विकास ठाकरे यांनी सहभाग घेतला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव शनिवारपासून बेमुदत बंद… केंद्र सरकारच्या निर्यात बंदी विरोधात व्यापा-याचा निर्णय

Next Post

नाशिकमध्ये उद्यापासून राज्यस्तरीय बालवैज्ञानिक महाकुंभ…..३०० हून अधिक बाल वैज्ञानिक सहभागी होणार

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना आरोग्याच्या तक्रारी भेडसावतील, जाणून घ्या, शनिवार, २० सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 19, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा मंत्री समिती गठीत…या सात मंत्र्यांचा समावेश

सप्टेंबर 19, 2025
IMG 20250919 WA0342 1
स्थानिक बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या अभियानात ७० हजारांचे उद्दिष्ट असतांना केली इतक्या झाडांची लागवड

सप्टेंबर 19, 2025
bbd creative
संमिश्र वार्ता

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये हे ५जी स्‍मार्टफोन सवलतीची दरात….

सप्टेंबर 19, 2025
IMG 20250919 WA0307 e1758286066150
स्थानिक बातम्या

एफडीएने नाशिकमध्ये १ लाख २५ हजारचा तुपाचा साठा केला जप्त…

सप्टेंबर 19, 2025
Untitled 29
संमिश्र वार्ता

पावसाळ्याच्या विश्रांतीनंतर चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुन्हा सुरु….

सप्टेंबर 19, 2025
crime 12
क्राईम डायरी

मुलींपाठोपाठ अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याचेही प्रमाण वाढले…वेगवेगळया भागात तीन घटना

सप्टेंबर 19, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1
संमिश्र वार्ता

आता लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये मिळवण्यासाठी e-KYC बंधनकारक…अशी पूर्ण करा प्रक्रिया

सप्टेंबर 19, 2025
Next Post
images 80

नाशिकमध्ये उद्यापासून राज्यस्तरीय बालवैज्ञानिक महाकुंभ…..३०० हून अधिक बाल वैज्ञानिक सहभागी होणार

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011