नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विश्वासाने वपरण्यासाठी दिलेल्या परमिटच्या माध्यमातून रिक्षा खरेदी करून ती परस्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भद्रकाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाना मुरलीधर काळे (रा.गंजमाळ,भद्रकाली) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. काळे यांच्या नावे असलेले रिक्षा परमिट त्यांनी विश्वासाने रामदास अबाजी शिंदे (रा.राणाप्रताप चौक,सिडको) या संशयितास वापरण्यासाठी दिले होते.
२०१९ मध्ये संशयिताने या परमिटच्या माध्यमातून नवीन रिक्षा खरेदी करून तिच्यावर परमिट चढविले होते. मात्र कालांतराने संशयित शिंदे याने काळे यांची परवानगी न घेता परस्पर विक्री केली. विश्वासघात झाल्याने काळे यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास जमादार आहिरे करीत आहेत.