इंडिाय दर्पण ऑनलाईन डेस्क
भाजपने छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान येथे निरीक्षकांची नियुक्ती जाहीर केली आहे. हे निरीक्षक आता आमदारांची बैठक घेऊन पुढील मुख्यमंत्री जाहीर करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या तिन्ही राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. आगामी लोकसभा डोळ्यासमोर ठेऊन ही निवड केली जाणार असल्यामुळे सगळ्यांची उत्सुकता ताणली गेली आह. आता हे निरीक्षक चर्चा करुन काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपाने राजस्थान येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि सरोज पांडे तर मध्य प्रदेशमध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, के लक्ष्मण, आशा लाक्रा यांना पाठवले आहे. तर छत्तीसगड केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा आणि सर्बानंद सोनोवाल आणि दुष्यंत गौतम यांची नियुक्ती केली आहे.
पाच राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल हाती आले असले तरी तीन राज्यातील अजून मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित झाले नाही. या तीन्ही राज्यात भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या असून ते सत्ता स्थापन करणार आहे. त्यात छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान आहे. या तिन्ही राज्यात जुने चेहरे बदलून नवीन नेत्यांनी संधी देण्याचा भाजपचे जवळपास ठरले आहे. त्यामुळे येथील माजी मुख्यमंत्री नाराज असले तरी त्यांनी ती कोठेही बोलून दाखवली नाही.