इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
हैदराबादः पाच राज्याचा विधानसभा निवडणुकीनंतर मध्यप्रदेश सोडून चारही राज्यात सत्ताबदल झाले. त्यात तेलंगणातही सत्ताधारी के. चंद्रशेखर रावला फटका बसला. त्यांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ते अगोदर चर्चेत होतेच. पण, आता त्यांना यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. बाथरूममध्ये पाय घसरल्याने ते जखमी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे बोलले जात आहे.
त्यांच्यावर हॉस्पिटलच्या नवव्या मजल्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. ते त्यांच्या एरवल्ली येथील फार्म हाऊसवर होते. रात्री घरातील बाथरुममध्ये घसरून ते पडले. त्यांच्या कमरेला आणि मांडीच्या हाडाला दुखापत झाली. त्यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.
या घटनेची मिळताच कुटुंबातील सर्व सदस्य हॉस्पिटलमध्ये आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर करावयाच्या वैद्यकीय चाचण्यांबाबत माहिती दिली.
तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या हातून झालेल्या पराभवानंतर त्यांनी लगेचच सरकारी निवासस्थान सोडले. तेव्हापासून ते फार्म हाऊसमध्ये राहतात. तेथेच ही घटना घडली.