इंडिाय दर्पण ऑनलाईन डेस्क
अरे बापरे! सत्तेपेक्षा देश महत्वाचा अशी एकदम नवी माहिती देवेंद्रजी यांनी दिली.महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेला हे माहीतच नव्हते..त्यांच्या देशात हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल,सिंचन घोटाळा फेम अजित पवार, ED फेम भावना गवळी, सरनाईक, मुलुंडचे नागडे पोपटलाल यांना मानाचे स्थान आहे..यांचा देश हा असा आहे! हल्ला फक्त मलिक यांच्यावर. बाकीचे यांच्या मांडीवर! पिते दूध डोळे मिटूनी..जात मांजराची अशी टीका ठाकरे गटाचे खा.संजय राऊत यांनी केली आहे.
नवाब मलिकांनी काल विधिमंडळात हजेरी लावल्यानंतर राजकारण चांगलेचे तापले आहे. त्यांनी अजित पवार गटाच्या आमदारांची भेट घेतली. त्यांच्या शेजारी बसले. त्यानंतर अजित पवारांना देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहले होते. त्यानंतर त्यावरुन संजय राऊत यांनी हा चिमटा काढला आहे. त्यांनी टीका करतांना भाजपसोबत असलेल्या नेत्यांची नावेच टाकली आहे.
तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नवाब मलिकांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना लिहिलेल्या पत्रावर टीका केली आहे. नवाब मलिक यांना पुरवणी मागण्यात महायुती सरकारनेच निधी दिला. आता ते आमच्या बरोबर नाहीत हे दाखवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे.
भाजप वर आरोप होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी हे ट्विट केले आहे. देशद्रोही म्हणून नवाब मालिकांचा उल्लेख भाजप आणि शिंदे गटाने केला. देशद्रोही माणूस म्हणून विधानसभेत आपण ज्यांचा उल्लेख केला सत्तेसाठी त्याच माणसाला आपण बाजूला बसवले तर जनता टीका करेल या भीतीने सोबत ही हवेत पण जवळ ही नको अशी स्थिती भाजपची झाली आहे.