इंडिया दर्पण ऑनलाईन
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असून दुस-या दिवशी विरोधक आक्रमक आहे. दहा दिवसांच्या या अधिवेशन काळात जवळपास शंभर मोर्चे अधिवेशनावर धडकणार आहेत. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरून जुंपत आहे.
मराठा आरक्षण, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, ड्रग्ज कारवाया, ड्रग्जचे कारखाने, आरोग्य विभागातील कथित घोटाळे आदी विषयांवर विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करत आहे. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी सरकार शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा करते का आणि मराठा आरक्षणासंदर्भात सरकार काय निर्णय घेते? याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अध्यादेश, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक, महाराष्ट्र वेश्म मालकी सुधारणा विधेयक या विधेयकासह पुरवण्या मागण्या आहे. यातील काही विषय पहिल्या दिवशी झाल्यानंतर आता दुस-या दिवशी काय चर्चा होते. हे आता बघा