इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॅा. भारती पवार यांच्याकडे आता आदिवास मंत्रालयाचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे. नाशिकमध्ये पहिल्यांदा एखाद्या खासदाराला अशी संधी मिळाली आहे. दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या डॉ. भारती पवार यांच्या रुपाने नाशिक जिल्ह्याला पहिल्यांदा केंद्रीय मंत्रीपद मिळाले त्यानंतर पुन्हा एक अतिरिक्त खाते मिळाले आहे.
या अगोदर नाशिकमधून लोकसभेवर निवडून गेलेल कै. यशवंतराव चव्हाण यांना सरंक्षण मंत्रीपद मिळाले होते. पण, ते नाशिकचे रहिवासी नव्हते. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या खासदार डॉ. पवार यांच्या द्वारे नाशिक जिल्हयाला पहिल्यांदाच केंद्रातील पद लाभले आहे.
डॉ. भारती पवार या दिंडोरी लोकसभा मतदार संघातून निवडून गेल्या. याअगोदर त्यांनी याच मतदार संघात राष्ट्रवादी पक्षातर्फे निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. पण, त्यांनी चिकाटी सोडली नाही. त्यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला. विविध आंदोलने केली. पण, त्यांना राष्ट्रवादीने २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत संधी न दिल्यामुळे त्या भाजपमध्ये गेल्या. या निवडणुकीत त्या विजयी झाल्या. निवडून आल्यानंतर त्यांनी कामाचा झपाटा सुरु ठेवला. त्यामुळे त्यांना अगोदर आरोग्य राज्यमंत्रीपद आता आदिवासी मंत्रालयाचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे.
असे झाले बदल
तीन राज्याच्या निवडणुका झाल्यानंतर काही बदल केंद्रीय मंत्रिमंडळात करण्यात आले आहेत. त्यात केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांच्याकडे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा कार्यभार देण्यात आला. तर केंद्रीय मंत्री सुश्री शोभा करंदलाजे यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांना जलशक्ती मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाचा कार्यभार आणि डॉ. भारती प्रवीण पवार यांच्याकडे त्यांच्या विद्यमान पोर्टफोलिओ व्यतिरिक्त, आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाचा कार्यभार देण्यात आला आहे.
यांनी दिला राजीनामा
नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद सिंग पटेल आणि रेणुका सिंह सरुता यांचे केंद्रीय मंत्रीपरिषदेचे राजीनामे दिले. त्यानंतर हे बदल करण्यात आले आहेत.