इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बिग बी अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर हे त्यांच्या पालकांच्या नावाने ओळखले जातात परंतु हे सगळेजण आता स्वतःची ओळख’ द आर्चीज’ चित्रपटाद्वारे बनवण्यास सज्ज झाले आहेत.
द आर्चीज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून सर्व स्टार किड्स आपल्या अभिनयाने स्वतःची ओळख बनवू पाहत आहेत. या चित्रपटाची दिग्दर्शिका झोया अख्तरने यामध्ये नवोदित कलाकारांना संधी न देता सर्व स्टार किड्स ला घेतल्यामुळे प्रेक्षकांनी या सिनेमाला नेपोटिझम असे विशेषण लावले. त्यानंतर ते बरंच ट्रोल ही केलं.
चित्रपटात ६० च्या दशकातील काळ दाखवला गेलाय. १९६४ च्या काळात अँग्लो इंडियन समाजात लोक कसे राहत होते हे दाखवले गेले आहे.
आर्चीच्या मित्रांचा ग्रुप असतो आणि त्यामध्ये सर्व मित्र-मैत्रिणी धमाल करतात. आर्चीच्या भूमिकेत अगस्त्य नंदाने उत्तम काम केलं असून त्या बरोबरीने सुहाना खान हिने विरोनिकाचे पात्र आणि खुशी कपूरने बेटी कपूरचे पात्र सक्षमपणे साकारले आहे.
सर्वच कलाकारांच्या अभिनयामध्ये आत्मविश्वास दिसून येतोय .याशिवाय मिहीर आहूजा, युवराज मेंडा, डॉट ,वेदांग रेना या तरुणांनी ही या चित्रपटात आपापल्या भूमिका छान प्रकारे साकार केल्या आहेत. अली खान ,कोयल पुरी आणि विनय पाठक हे दमदार कलाकार सुद्धा चित्रपटात उत्तम अभिनयाद्वारे लक्षात राहतात. सर्वच कलाकारांनी चित्रपट यशस्वीतेसाठी खूप मेहनत घेतली आहे हे चित्रपट पाहून लक्षात येते.