सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सिन्नर विधानसभा मतदारसंघातील रस्ते ,पूल व इमारतींसाठी १३१ कोटी रुपये निधी मंजूर झाला.यातून ४३ रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे.
सिन्नर मतदारसंघातील खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी निधीची मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यानुसार हिवाळी अधिवेशनात या रस्त्यांना मंजूरी देण्यात आली. त्यामध्ये प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या निमगाव सिन्नर ते कोळपेवाडी या रस्त्याच्या शिंदेवाडी ते शहा हद्द या सुमारे ८ किमी रस्त्याचे रुंदीकरण व कॉंक्रीटीकरण कामासाठी १२ कोटी रुपये,प्रमुख राज्यमार्ग १२ डुबेरे पाडळी समशेरपूर या रस्त्याच्या पहिल्या ८ किमी रस्त्याच्या सुधारणेसाठी ८ कोटी रुपये,प्रमुख जिल्हा मार्ग क्र.३० डुबेरे ते फर्दापूर सोमठाणे सांगवी ते इतर जिल्हा मार्ग ३२ व प्रजीमा १११ च्या ३६ ते ४३ किमी साठी ५ कोटी रुपये व २७ ते ३३ किमी च्या सुधारणेसाठी १० कोटी रुपये,सिन्नर जायगाव-नायगाव प्रमुख जिल्हा मार्ग किमी ५ ते १३ च्या रुंदीकरण व सुधारणेसाठी १० कोटी रुपये, दोडी खुर्द ते रामोशी वाडी पाटोळे या २.५की.मी. रस्त्याची सुधारणा करणे १.५ कोटी,राष्ट्रीय महामार्ग ते दोडी खुर्द रस्त्याची सुधारणा करणे यासाठी १.५ कोटी
असा सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गतच्या सर्वसाधारण रस्त्यांसाठी ४८ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या आदिवासी भागातील रस्त्यांच्या सुधारणेला आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नांतून आदिवासी विकास विभागाकडून मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाला आहे.
टाकेद गटातील व सिन्नर तालुक्यातील अनेक आदिवासी रस्त्यांसाठी यापूर्वी आमदार कोकाटे यांनी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून आणला आहे.तथापि, आदिवासी भागातील रस्त्यांची अनेक वर्षांपासून दुरावस्था झाली असून, वाड्यापाड्यांना जोडणार्या या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे दळणवळणाभावी आदिवासींच्या उपजीविकेवर गंडांतर आले आहे. आदिवासी बांधव उपजीविकेसाठी शेतीमधील पिकाव्यतिरिक्त लागवड केलेला भाजीपाला, तसेच पावसाळी रानभाज्या जमा करून मुख्य गावांमध्ये बाजारात विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र खराब रस्त्यांमुळे कोणतेही वाहन वस्तीवर येत नसल्याने डोक्यावर ओझे घेऊनच त्यांना बाजार गाठावा लागतो. एखादी व्यक्ती आजारी झाल्यास त्याला दवाखान्यात नेण्यासाठी चादरीची डोली करून त्यातून मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागते. यामुळे हे आदिवासी मेटाकुटीला आलेले आहेत.टाकेद गटातील बांधवांची ही समस्या ओळखून आमदार माणिकराव कोकाटे यांनी पाठपुरावा करून आदिवासी विकास विभागाच्या निधी अंतर्गत सुमारे ३५ कोटी रुपयांची रस्ता कामे मंजूर झाली आहेत. धोंडबार ते जिल्हा हद्द रस्ता सुधारणा करणे ३ कोटी,टाकेद ते म्हैसवळण घाट रस्ता सुधारणा करणे ५ कोटी,शिवडे ते भैरवनाथ मंदिर रस्ता सुधारणा करणे १ कोटी,औंढे ते औंढेवाडी फाटा ते धोंडबार रस्ता सुधारणा करणे २ कोटी,शुक्लतीर्थ ते खेड भरवस रस्ता सुधारणा करणे ३ कोटी, खेड ते भैरवनाथ मंदिर ठाकूरवाडी रस्ता सुधारणा करणे २.५ कोटी,कोनांबे ते डाळेवस्ती ते खापराळे रस्ता सुधारणा करणे १.५ कोटी,भांगरेवाडी ते बोकळेवाडी सोनोशी रस्ता सुधारणा करणे १ कोटी, वासाळी ते काचरवाडी वाघ्याची वाडी रस्ता सुधारणा करणे १कोटी, अडसरे खु ते भंडारदरवाडी रस्ता सुधारणा करणे १ कोटी, वासाळी ते राहुलनगर रस्ता सुधारणा करणे १कोटी,धाडोशी रस्ता सुधारणा करणे १कोटी, धोंडबार ते आवारे वस्ती रस्ता सुधारणा करणे ७० लाख, घोरवड ते घोडेवाडी रस्ता सुधारणा करणे १ कोटी, घुटेवाडी ते रताळवाडी रस्ता सुधारणा करणे १ कोटी, घुटेवाडी ते रताळवाडी रस्ता सुधारणा करणे १ कोटी,ठाणगाव सरकारी दवाखाना ते डगळे वस्ती रस्ता सुधारणा करणे १.५ कोटी,राहुलनगर ते भोईरवस्ती रस्ता सुधारणा करणे ५० लाख , धामणी ते बेलगाव फाटा रस्ता सुधारणा करणे ५० लाख , भरवीर बु ते स्मशानभूमी रस्ता सुधारणा करणे ५० लाख, पिंपळगाव मोर ते झोपडपट्टी भंडारदरा रस्ता सुधारणा करणे ५० लाख, धोंडबार ते पाचपट्टा रस्ता सुधारणा करणे १.५ कोटी , कमळदरवाडी ते आडवाडी रस्ता सुधारणा करणे २५ लाख, जांभूळवाडी ते सोनेवाडी रस्ता सुधारणा करणे ५० लाख, वाघदरवाडी ते हिवरे रस्ता सुधारणा करणे २ कोटी , निनावी ते कडवाधरण स्मशानभूमी रस्ता सुधारणा करणे १ कोटी, वासळी ते गावठा रस्ता ३कोटी,खेड ते इंदोरे रस्ता १ कोटी २० लाख,इंदोरे ते माळवाडी १ कोटी २०लाख,टाकेद खु ते तातळेवाडी रस्ता १ कोटी २० लाख,निनावी ते महादेववाडी गिरेवाडी १ कोटी २० लाख,निनावी ते बाजारवाट भरवीर रस्ता१ कोटी २० लाख,कवडदरा ते घोटी खुर्द रस्ता १ कोटी २० लाख,शेनवड ते खडकवाडी १ कोटी २० लाख,बेलगाव तऱ्हाळे ते गांगडवाडी १ कोटी १० लाख निधी मंजूर झाला आहे.
ठाणगाव ते केळी रस्त्यावर होणार पूल..
ठाणगाव ते केळी रस्त्यावर पूल नसल्याने पावसाळ्यात या ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा व्हायचा.परिसरातील ग्रामस्थांच्या समस्येची दखल घेत आमदार माणिकराव कोकाटे यांनी या रस्त्यावरील पुलासाठी सुमारे ३.५ कोटी रुपये निधी मंजूर करून आणला आहे.पावसाळ्यापूर्वी या पुलाचे काम पूर्ण होऊन या भागातील दळणवळण सुलभ होणार आहे.
धोंडबार येथील आदिवासी आश्रम शाळेत होणार सुविधांयुक्त वसतीगृह…
सिन्नर तालुक्यातील धोंडबार येथील आदिवासी आश्रम शाळा आहे.या शाळेत विद्यार्थ्यांसाठी चांगल्या दर्जाचे वसतीगृह बांधकाम करावे,अशी मागणी आदिवासी बांधव व शिक्षकांनी आमदार कोकाटे यांच्याकडे केली होती.त्यानुसार मुलींच्या वसतीगृह इमारतीसाठी सुमारे १४ कोटी व मुलांच्या वसतिगृह इमारतीसाठी सुमारे १३ कोटी रुपये निधी आमदार कोकाटे यांनी मंजूर करून आणला आहे.या वसतीगृहात सर्व प्रकारच्या सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
समतोल विकासासाठी पायाभूत सेवांना प्राधान्य..
वर्षानुवर्षे आदिवासी बांधव विकासापासून दूर राहिला. याचे कारण म्हणजे त्या भागात पायाभूत सेवा व सुविधा वेळेत निर्माण केल्या गेल्या नाही.टाकेद गटातील आदिवासी गावांमध्ये राज्यशासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उभ्या करून आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे आपले ध्येय आहेच.तथापि, इतर भागातही रस्त्यांचे जाळे मजबूत करून दळणवळण सुलभ करून सर्वांना दिलासा देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.अजित दादांची पाठराखण केल्याने सिन्नर तालुक्याला मोठ्या प्रमाणावर निधी मिळू लागला आहे.
माणिकराव कोकाटे, आमदार सिन्नर विधानसभा