नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हा परिषदेच्या वतीने विविध संवर्गांसाठी पदभरती करण्यात येत आहे ५ ऑगस्ट रोजी या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीच्या अनुषंगाने आता कनिष्ठ सहाय्यक लिपिक, औषध निर्माण अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदासाठी होणार परीक्षा या ३ संवर्गातील पदांसाठी आयबीपीएस कंपनीच्या वतीने विविध परीक्षा केंद्रांवर १८ ते २६ डिसेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे.
यासंदर्भातील जिल्हा परिषद पदभरतीचे वेळापत्रक व परीक्षा केंद्र यासाठीचे प्रकटन हे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आले असून, नाशिक जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर हे प्रकटन उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व परीक्षार्थींनी याबाबत नोंद घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
हॉलतिकीट डाऊनलोड कुठून करावे – जिल्हा परिषद पदभरतीतील ३ संवर्गाच्या परीक्षा या १८ ते २६ डिसेंबर रोजी होणार असून आयबिपीएस कंपनीच्या http://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04 या संकेतस्थळावरून विद्यार्थांना हॉल तिकीट उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांनी रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबर व ईमेल आयडीवर देखील हॉल तिकीटची लिंक पाठवण्यात आलेली आहे.
कुठल्या पदासाठी कधी होणार परीक्षा –
१) कनिष्ठ सहायक लिपिक : दि. १८, १९, २० डिसेंबर
२) औषध निर्माण अधिकारी : २१ व २६ डिसेंबर
३) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक : २३, २४ डिसेंबर