इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावरुन महायुतीत मतभेद निर्माण झाले आहे. नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मलिक यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी थेट अजित पवार यांना पत्र पाठवून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता अजितदादा या पत्राला कसे उत्तर देतात हे महत्त्वाचे आहे.
मलिक आज हिवाळी अधिवेशना आले. त्यानंतर ते सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या आमदारांच्या जवळ बसले. त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली. मलिक यांच्यावर याअगोदर भाजपने गंभीर आरोप केल्यामुळे ही टीका भाजपलाही चांगलीच झोंबली.
त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र पाठवून सविस्तर भूमिका मांडली आहे. या पत्रात फडणवीस यांनी नवाब मलिक यांना महायुतीत सहभागी करुन घेण्यास विरोध दर्शवला आहे.