इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नेता कोणत्याही पक्षाचा असो ते जे सांगतो ते करतोच असे नाही. पण, हे करतांना तो असे काही करतो की सर्वांनाच धक्का बसतो. त्याने सांगितलेले तर तो करतो. पण, लोकांना जे हवे असते किंवा त्यांना ते वाटते ते मात्र होत नाही. असाचा प्रकार मध्यप्रदेशमधील निवडणुकीत घडला व तो देशभर चर्चेचा विषय ठरला.
मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकी अगोदर काँग्रेसचे आमदार फुलसिंग बरैया यांनी भाजपला ५० जागा जरी मिळाल्या तर मी सार्वजनिक ठिकाणी तोंड काळे करेल अशी घोषणा केली. त्यानंतर या राज्यात निवडणुका झाल्या. २३० जागापैकी भाजपने तब्बल १६३ जागा जिंकल्या तर काँग्रेसला अवघ्या ६६ जागा मिळाल्या. त्यानंतर बरैयाच्या घोषणांची सर्वांनी आठवण करुन दिली.
कालच आ. बरैयांच्या एका कार्यकर्त्यांनी तोंड काळे करुन घेतले. त्यानंतर पुन्हा सोशल मीडियावर बरैया केव्हा करणार ही चर्चा सुरु झाली. त्यानंतर बरैया यांनी मी केलेली घोषणा प्रत्यक्षात करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर ते आज दुपारी थेट बाहेर पडले. भोपाळमधील राजभवनाबाहेर ते आले. यावेळी त्यांच्या बरोबर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिहं होते. त्यानंतर पुर्ण ड्रामा सुरु झाला. बघ्यांची संख्याही वाढली. बरैया यांनी काळी शाईची बाटली काढली. सर्वांची उत्सुकता ताणली गेली. पण, त्यांनी काढलेली शाई स्वतच्या तोंडावर न लावता ईव्हीएम दाखवणाऱ्या पोस्टरवर मारली. यावेळी त्यांनी या निवडणुकीचे निकाल हे ईव्हीएममध्ये फेरफार करुन मिळवल्याचा आरोप केला. आता तु्म्हीच ठरवा त्यांनी जी घोषणा केली ती त्यांनी केली की नाही…