इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
प्रेमात पडलेल्या माणसाला कितीतरी अडचणीला सामोर जावे लागले. ब-याच वेळा त्यांचे प्रेमप्रकरण यशस्वी होते. तर काही अडचण आल्यास ते अपूरे राहते. अशीच घटना राजस्थान व उत्तर प्रदेशच्या एका प्रेमीयुगलाबाबत घडली. दोघांचे सोशल मीडियाच्या चॅटींगमधून प्रेम जुळले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण, त्यांच्या या प्रेमात कुटुंबिय नाही तर एक कॅबवाला व्हिलन ठरला..
घटना साधी सोपी असली तरी हे प्रेमी युगल मात्र कॅबवाल्यांच्या निर्णयामुळे अडचणीत आले. ही घटना तशीच आहे. राजस्थानमध्ये जयपुर येथील बनार गावतील हितेश यांची मैत्री सोशल मीडियाव्दारे मुजफ्फरनगर येथील खतौली गावातील तरुणीबरोबर झाली. अनेक वेळा चॅटिंग व फोनवरुन बोलल्यानंतर त्यांनी अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्लॅन तयार झाला.
मंगळवारी रात्री हितेश रेल्वेने मेरठ येथे आला. त्याने कॅब बुक केली. त्यानतंर तो तरुणीला भेटायला खतौलीला गेला. या ठिकाणी तरुणी प्लॅननुसार तयार होती. कॅब आल्याचे कळताच ती ठरलेल्या ठिकाणी आली व ती कॅबमध्ये बसली. पण, यावेळेस ती घाबरली होती. कॅबच्या ड्रायव्हरला शंका आली. त्याने हितेशचा विचारणा केली. पण, त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे कॅब ड्रायव्हरने थेट कार मेरठ येथील मवाना येथील पोलिस स्टेशनमध्ये नेली.
याठिकाणी त्याने जोरदार आरडाओरड केल्यानंतर पोलिसही कारजवळ आले. त्यानंतर त्याने संशय व्यक्त करत घटना सांगितली. हे सर्व होत असतांना प्रेमीयुगल प्रचंड घाबरले. त्यांनी पोलिसांना सर्व माहिती दिली. पोलिसांनी दोघांच्या घरच्यांना फोन लावले. घरच आले व त्यांनी दोघांनी आपआपल्या घरी नेले. या कॅबमुळे या तरुण प्रेमीयुगलाची कहाणी मात्र अपूरी राहिली. तो या दोघांच्या प्रेमप्रकरणातला व्हिलन ठरला हे नक्की