नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंतप्रधान असताना घेतलेल्या निर्णयांमुळे झालेल्या दोन मोठ्या चुकांमुळे जम्मू-काश्मीरला वर्षानुवर्षे त्रास सहन करावा लागला, असे गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत बोलतांना सांगितले. यावेळी ते म्हणाले की. पंडित नेहरूंची पहिली चूक होती की आपले लष्कर जिंकत असताना पंजाबमध्ये पोहोचताच त्यांनी युद्धविराम घोषित केला आणि पाकव्याप्त काश्मीरचा जन्म झाला. युद्धविराम ३ दिवस विलंबाने झाला असता, तर पाकव्याप्त काश्मीर आज भारताचा भाग झाला असता, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
जेव्हा त्यांनी हा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेला, ही दुसरी मोठी चूक झाली, असे ते म्हणाले. हे प्रकरण जेव्हा संयुक्त राष्ट्राकडे पाठवायचे होते तेव्हाही अत्यंत घाईघाईने निर्णय घेण्यात आला, असे त्यांनी सांगितले. सर्वप्रथम, हे प्रकरण संयुक्त राष्ट्रांकडे नेण्याची गरज नव्हती आणि जरी नेण्यात आले तरी , हे प्रकरण संयुक्त राष्ट्र सनदीच्या अनुच्छेद ३५ ऐवजी कलम ५१ नुसार न्यायला हवे होते, असे त्यांनी सांगितले.
माजी पंतप्रधान दिवंगत जवाहरलाल नेहरू यांनी ही त्यांची चूक असल्याचे लिहिले आहे, परंतु ही चूक नसून घोडचूक होती. देशाचा बराच भूभाग गेला, ही एक घोडचूक होती, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी लोकसभेत जम्मू आणि काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक, २०२३ आणि जम्मू आणि काश्मीर
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी लोकसभेत जम्मू आणि काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक, २०२३ आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (सुधारणा) विधेयक, २०२३ वरील चर्चेला उत्तर देताना ही माहिती सांगितली. त्यानंतर विरोधकांनी गदारोळही केला.