गुरूवार, जुलै 31, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर इतके लाख लेखापरीक्षण अहवाल दाखल, प्राप्तिकर विभागाने मानले आभार

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 2, 2023 | 10:24 pm
in संमिश्र वार्ता
0
income tax pune e1611467930671

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्‍ली – कर लेखापरीक्षण अहवाल दाखल करण्याच्या ३० सप्टेंबर २०२३ या अंतिम तारखेपर्यंत ई-फायलिंग पोर्टलवर मूल्यांकन वर्ष २०२३-२४ साठी सुमारे २९.५ लाख कर लेखापरीक्षण अहवालांसह ३०.७५ लाखांहून अधिक लेखापरीक्षण अहवाल दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये फॉर्म क्र. 29B, 29C, 10CCB, आदींमध्ये लेखापरीक्षण अहवाल देखील समाविष्ट असून निर्धारित वेळेत अनुपालन सुनिश्चित केले आहे.

करदात्यांच्या सुविधेसाठी, व्यापक संपर्क कार्यक्रम राबवण्यात आले. करदात्यांना देय तारखेच्या आत कर लेखापरीक्षण अहवाल आणि इतर लेखापरीक्षण फॉर्म दाखल करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ई-मेल, एसएमएस, सोशल मीडिया, प्राप्तिकर पोर्टलवर माहिती संदेशांसह सुमारे ५५.४ लाख संपर्क कार्यक्रम राबवण्यात आले. करदात्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयकर पोर्टलवर विविध वापरकर्ता जागरूकता व्हिडिओ अपलोड करण्यात आले. करदात्यांना आणि कर व्यावसायिकांना निर्धारित तारखेच्या आत लेखापरीक्षण अहवाल दाखल करण्यासाठी हे एकत्रित प्रयत्न उपयुक्त ठरले आहेत.

ई-फायलिंग पोर्टलवर एवढ्या मोठ्या संख्येने लेखापरीक्षण अहवाल दाखल होऊनही पोर्टलचे कामकाज सुरळीत सुरु राहिले. याबद्दल सोशल मीडियासह विविध प्लॅटफॉर्मवर व्यावसायिकांनी कौतुक केले आहे.ई-फायलिंग हेल्पडेस्क टीमने सप्टेंबर, २०२३ मध्ये करदात्यांच्या अंदाजे २.३६ लाख प्रश्नांची उत्तरे दिली, ज्यामुळे फाइलिंग कालावधी दरम्यान करदात्यांना आणि कर व्यावसायिकांना गुंतागुंतीचे निराकरण करण्यात मदत झाली आहे. इनबाउंड कॉल्स, आउटबाउंड कॉल्स, लाइव्ह चॅट्स, वेबेक्स आणि को-ब्राउझिंग सत्रांद्वारे हेल्पडेस्कने मदत केली. हेल्पडेस्क टीमने ऑनलाइन रिस्पॉन्स मॅनेजमेंट द्वारे विभागाच्या ट्विटर हँडलवर प्राप्त झालेल्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी देखील मदत केली. त्याना रिअल-टाइम आधारावर विविध समस्यांबाबत सहाय्य प्रदान केले. कर व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यासाठी ऑडिट फॉर्म भरण्याशी संबंधित विविध वेबिनार आयोजित करण्यात आले होते. सर्व कर व्यावसायिक आणि करदात्यांनी अनुपालनामध्ये केलेल्या सहकार्याबद्दल प्राप्तिकर विभागाने आभार मानले आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

खंडणी मागायला आले अन् जाळ्यात अडकले

Next Post

ग्रामीण विकास योजनांच्या निधीवरुन पश्चिम बंगाल व केंद्र सरकारमध्ये जुंपली, केंद्र सरकारने दिले हे उत्तर

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
image00124LB

ग्रामीण विकास योजनांच्या निधीवरुन पश्चिम बंगाल व केंद्र सरकारमध्ये जुंपली, केंद्र सरकारने दिले हे उत्तर

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी पैशाचा अपव्यय काळजीपूर्वक टाळावा, जाणून घ्या, गुरुवार, ३१ जुलैचे राशिभविष्य

जुलै 30, 2025
bjp11

शरद पवार गटाला धक्का….या माजी मंत्रीने त्यांच्या दोन पुत्रांसह केला भाजपामध्ये प्रवेश

जुलै 30, 2025
CM

उद्योगांच्या सर्व परवानग्या आता मैत्री पोर्टलवर ऑनलाईन मिळणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जुलै 30, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

राज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम होणार सुरू….

जुलै 30, 2025
trump 1

भारतावर २५ टक्के ट्ररिफ लावण्याची डोनाल्ड ट्रम्पची घोषणा…

जुलै 30, 2025
IMG 20250730 WA0238 1

येवल्यातील विस्थापित गाळे धारकांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक…

जुलै 30, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011