माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस त्यानंतर चक्रीवादळ यामुळे एकुणच वातावरण बदलले आहे. पण, आता नेमके पुढील दिवस वातावरण कसे असेल याबद्दल हवामानतज्ञ माणिकराव खूळे यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रातील सध्याचे ढगाळ वातावरण तसेच विदर्भातील वर्धा नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया अश्या ६ जिल्ह्यातील पावसाची शक्यता त्यानंतर शुक्रवार ८ डिसेंबरपासून पूर्णपणे निवळून थंडीला सुरवात होण्याची शक्यता जाणवते.
त्याचप्रमाणे अरबी समुद्रातील तीव्रतेत जाऊन महाराष्ट्र भू-भागावर वळणारे कमी दाब क्षेत्र पश्चिमेकडे सरकून समुद्रातच विरळण्याच्या शक्यतेमुळे सोमवार ११ डिसेंबर ते बुधवार १३ डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातील अपेक्षित किरकोळ पावसाची शक्यताही आता मावळली आहे,
उत्तर भारतात सध्या एकापाठोपाठ प्रवेशणारे पश्चिमी झंजावात, त्यातून पडणारा पाऊस व बर्फबारीमुळे तेथील सकाळची दृश्यता खालावली असून तेथे थंड वातावरण व धुके जाणवत आहे. शुक्रवार डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या थंडीला अडथळाही आता दूर होऊन पूरकता मिळू शकते, असे वाटते.
महाराष्ट्रातील फळबागांना होणारा धोका, लाल कांदा काढणी, उन्हाळ कांदा लागवड इ. सारख्या शेतकामांसाठीची गैरसोयही टळू शकतात.
सध्या एव्हढेच!
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd.)
IMD Pune.