इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची कन्या सारा आणि भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिल या दोघांची गेल्या काही दिवसांपासून अफेअरची प्रचंड चर्चा आहे. आता त्यात त्यांचा ब्रेकअप झाल्याची बातमी सर्वत्र पसरली आहे. त्याचे कारणही तसेच घडले आहे. शुभमन गिल सध्या इंग्लडमध्ये असून त्याच्या बरोबर अभिनेत्री अवनीत कौर दिसत आहे. या दोघांचा एकत्रित फोटो व्हायरल झाल्यामुळे ही ब्रेकअपची बातमी पसरली आहे.
खरं तर सारा व शुभमन गिलचे अफेअर आहे का ते एकमेकांच्या प्रेमात आहे का? याबद्दल दोघांनीही कधी सार्वजनिक ठिकाणी वक्तव्य केलेले नाही. तरी सुध्दा त्यांची चर्चा होत असते. वर्डकपमध्ये सुध्दा ही चर्चा होती. २०१९ मध्ये आयपीएल सामन्यानंतर शुभमन गिल चर्चेत आला आणि सोबत सारा तेंडुलकर आणि त्यांचे नाते यावरही चर्चा रंगायला लागल्या. त्यानंतर दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो देखील केले होते.
पण, आता ही चर्चा अभिनेत्री अवनीत कौरमुळे आहे. खरं तर ते एका म्युझिक व्हिडिओसाठी गेलेले असून त्याचा हा फोटो असून त्यात त्यांच्याबरोबर अंशुल गर्ग, राघव शर्मा सुध्दा आहे.