इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
तेलंगणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष ए रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे पुढील मुख्यमंत्री असणार आहे.काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. वेणुगोपाल म्हणाले की शपथविधी सोहळा गुरुवारी, ७ डिसेंबर रोजी होणार आहे. रेवंतरेड्डी यांना विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या जबरदस्त विजयाचे श्रेय दिले जाते आणि ते काँग्रेसच्या विजयी मोहिमेचा चेहरा होते.
तीन राज्यात काँग्रेसचा दारुण पराभव झाला असला तरी तेलंगणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तेलंगणाची स्थापना झाल्यानंतरची ही तिसरी निवडणूक होती. या निवडणुकीत केसीआर मुख्यमंत्री म्हणून हॅट्ट्रिक करणार असे चित्र असतांना काँग्रेसने येथे सत्ता हस्तगत केली आहे. दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या केसीआर यांच्यासाठी काँग्रेसने य़ेथे मोठा धक्का दिला.तेलंगणात केसीआर यांच्या पक्षाला ४० तर काँग्रेसला ६४ जागा मिळल्या आहेत.
अगोदरपासूनच नाव चर्चेत
तेलंगणामध्ये काँग्रेसकडून रेवंत रेड्डी यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी अगोदरपासूनच चर्चेत होते. राज्यातील विधानसभा निवडणूकीत रेवंत रेड्डी हे प्रचाराच्या केंद्रस्थानी होते. रेवंत रेड्डी काँग्रेसचे खासदार आहे. आता त्यांचा प्रवास खासदार ते मुख्यमंत्री असा झाला आहे. ५४ वर्षीय रेड्डी काँग्रेसची मोठी ताकद आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून त्यांचा प्रवास सुरु झाला. त्यानंतर ते टीडीएफमध्ये गेले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन आपले स्थान भक्कम केले आहे. आता ते मुख्यमंत्री होणार आहे.