इंडिया दर्पण वृत्तसेवा, नाशिक
येवला शहरात सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसाने महामार्गासह शहरातील अनेक गल्ली-बोळातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले. पाण्याच्या प्रवाहाने अनेक दुचाकी रस्त्यात आडव्या झाल्या तर सखल भागातील काही घरांमध्ये पाणी घुसले.
या मुसळधार पावसामुळे घरातील पाणी बाहेर उपसण्यासाठी कसरत करावी लागली. तर रस्त्या लगत असलेल्या दुकानामध्ये पाणी गेल्याने व्यावसायिकांची तारांबळ उडाली. पावसाचा जोर जास्त असल्याने वीज पुरवठा काही भागात खंडित झाल्याने नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला.
शहरातील गटारांची व्यवस्थित स्वच्छता न केल्याने पाणी रस्त्यांवरून व घरामध्ये शिरल्याचे बोलले जात आहे. या मुसधार पावसामुळे मोठे नुकसान झाल्याचेही बोलले जात आहे.