इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
‘मिचॉन्ग’ चक्रीवादळाचा दक्षिणेकडील राज्यांना फटका बसला आहे. चेन्नईत वादळ आणि मुसळधार पावसामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच ७० उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत तर २०४ रेल्वे रद्द करण्यात आल्या आहे. या चेन्नईच्य पुरात अभिनेता आमिर खानही अडकला होता. पण, त्याला बचाव पथकाने सुरक्षित बाहेर काढले आहे. या घटनेचे ट्विट तामिळ अभिनेता विष्णू विशाल याने केले आहे.
तो सुध्दा पुरात अडकला होता. त्याने म्हटले आहे की, अशा कसोटीच्या काळात तामिळनाडू सरकारचे उत्तम काम करत आहे. अथकपणे काम करणाऱ्या सर्व प्रशासकीय लोकांचे आभार…विष्णू विशालच्या घरात पाणी शिरले होते. त्यानंतर त्याने मदतीसाठी हाक मारली आहे. वीज नाही वायफाय नाही, फोन सिग्नल नाही, काहीही नाही. फक्त एका विशिष्ट ठिकाणी टेरेसवर मला काही सिग्नल मिळच असल्याचा अनुभवही त्याने सांगितला.
या कारणाने आमिर खान चेन्नईला
चेन्नईत आमिर खानची आई झीनत खानवर उपचार सुरू आहे. त्यामुळे तो मेडिकल सेंटरच्या जवळ असलेल्या हॉटेलमध्ये राहत आहे. आमिरला अभिनय व चित्रपटांची निर्मिती करण्याव्यतिरिक्त त्याच्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवायचा असल्यामुळे तो चेन्नईत शिफ्ट झाला आहे.