जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – १ नोव्हेंबर, २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित महाराष्ट्र विधानपरिषद नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रारुप मतदार याद्या २३ नोव्हेंबर २०२३ रोजी विभागीय आयुक्त कार्यालय तसेच नाशिक विभागातील जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयात प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.
या सर्व ठिकाणी प्रारुप मतदार यादी पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. प्रारुप मतदार यादीमधील दुरुस्तीबाबत दावे अथवा हरकती असल्यास ९ डिसेंबर, २०२३ पर्यंत स्विकारण्यात येतील. असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त रमेश काळे यांनी केले आहे.
नाशिक विभाग शिक्षण मतदार संघाच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असून त्यात मतदार याद्याचे काम सुरु आहे. त्यामुळे त्याच्यावरील हरकती झाल्यानंतर अंतिम यादी तयार होणार आहे.