नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठा समाजाच्या निगडित असलेल्या आर्थिक दुर्बल घटकांना शिक्षणात ( ईडब्यूएस ) मिळणाऱ्या शिष्यवृत्ती विषयी खासदार गोडसे यांनी आज लोकसभेत प्रश्न विचारून शासनाचे लक्ष ईडब्यूएसच्या आरक्षणाकडे केंद्रित केले. ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या आधारे मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील एमफील आणि पीएचडीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणात केंद्रिय संस्थांकडून शिष्यवृत्ती मिळते का,मिळत असल्यास लाभार्थींची संख्या नेमकी किती तसेच मिळत नसल्यास सदर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तातडीने सुरू करण्याची आग्रही मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी आज संसदेत केली.
गेल्या काही वर्षांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा विषय गाजत आहे.मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मिळावे अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून राज्यात जोर धरू लागली आहे.या मुद्द्यावरून मागील महिन्यात राज्यातील काही भागात जाळपोळीच्या घटना घडलेल्या आहेत.मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना शिक्षण आणि नोकरीत शिष्यवृत्ती मिळावी यासाठी शासनाने चार वर्षापूर्वी ईडब्यूएसचे आरक्षण घोषित केलेले आहे.असे असले तरी एडब्ल्यूएसच्या आरक्षणाचा लाभ मराठा समाजातील आर्थिक मागास घटकातील विद्यार्थ्यांना मिळत नसल्याच्या तक्रारी अनेकांनी खासदार गोडसे यांच्याकडे केल्या आहेत.
ईडब्यूएसच्या आधारे राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या संस्थांकडून एमफील तसेच पीएसडीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो किंव नाही याविषयी शंका -कुशंका आहेत.मराठा जमाजातील मान्यवंराकडून आलेच्या तक्रारींची दखल घेत खासदार गोडसे यांनी आज थेट संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केला.ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या आधारे मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील एमफील आणि पीएचडीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणात केंद्रिय संस्थांकडून शिष्यवृत्ती मिळते का,मिळत असल्यास लाभार्थींची संख्या नेमकी किती तसेच मिळत नसल्यास सदर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तातडीने सुरू करण्याची आग्रही मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी आज संसदेत केली. याविषयीची सविस्तर माहिती लवकरच मागविण्यात येणार असल्याची ग्वाही केंद्रिय ओबीसी मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी दिली आहे.