इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री कोण होणार? शिवराजसिंह यांच्या योजनांमुळे भाजपला यश मिळाल्याने त्यांच्याकडेच पुन्हा नेतृत्व सोपवणार, कैलास विजयवर्गीय यांना जबाबदारी देणार, की दिल्लीतून पाठवलेल्या नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे नेतृत्वाची धुरा देणार अशी चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, की ते आधीही मुख्यमंत्रिपदाचे दावेदार नव्हते आणि आजही नाहीत.
मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीचा चेहरा कोण असेल हे जाहीर करण्यात आले नव्हते. या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांच्याच नावावर निवडणुका लढवल्या गेल्या होत्या. पण, शिवराजसिंह यांच्या योजनांचाही मात्र या निवडणुकीत मोठा फायदा झाला. आता निवडणुकीनंतर या ठिकाणी पेज तयार होणार आहे. तो मुख्यमंत्रीपदाचा त्यामुळे शिवराजसिंह यांनी स्वत.च मी दावेदार नसल्याचे सांगत काढता पाय घेतला आहे. एकतर त्यांना भाजपने असे सांगायला लावले असेल किंवा त्यांना पद मिळणार नाही याबाबत साशंकता असेल. पण, काहीही असो ते काय म्हणाले हे महत्त्वाचे आहे.
शिवाराजसिंह म्हणाले की, मी पक्षाचा कार्यकर्ता असून पक्ष जे काही काम देईल ते पूर्ण क्षमतेने आणि प्रामाणिकपणे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. चौहान यांनी व्हिडीओ संदेशात सांगितले… मुख्यमंत्रिपदाचा दावेदार नव्हतो आणि आजही नाही. एक कार्यकर्ता या नात्याने, भारतीय जनता पक्ष जे काही काम मला देईल ते मी माझ्या सर्व शक्तीने, क्षमतेने आणि प्रामाणिकपणाने, समर्पण वृत्तीने करीन.
मोदी आमचे नेते आहेत आणि त्यांच्यासोबत काम करताना आम्हाला नेहमीच अभिमान आणि आनंद वाटत आला आहे, असे त्यांनी सांगितले. मध्य प्रदेशमध्ये सरकार स्थापनेची प्रक्रिया आणि मुख्यमंत्री निवडीवरून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असताना चौहान यांनी हे वक्तव्य केले आहे. या वेळी भाजपने चौहान यांना मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून घोषित केले नव्हते. पक्षाने तीन मंत्र्यांसह सात खासदार आणि ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी दिली होती. तेव्हापासून भाजपकडून या वेळी राज्यातील नेतृत्व बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.