इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
काँग्रसचा तीन राज्यात दारुण पराभव झालेला असतांना तेलंगणामध्ये मात्र काँग्रेसने घवघवीत यश मिळवले आहे. या य़शात काँग्रेसचे महाराष्ट्राचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे त्यांना आता महाराष्ट्रातही मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समितीचा दबदबा होता. त्यात केसीआरचा पराभव करणे तसे सोपे नव्हते. या ठिकाणी भाजपने जोर लावला होता. तर ओवीसीचेही मोठे आव्हान होते. पण, यातून काँग्रेसने फक्त विजयच मिळवला नाही तर मोठया प्रमाणात आमदारही निवडून आणले. त्यामुळे दहा वर्षांनी तेलंगणात सरकार स्थापन करण्यात काँग्रेसला यश आले.
माणिकरवार ठाकरे राज्याच्या राजकारणात फारसे सक्रिय नसले तरी ते गेल्या एका वर्षापासून तेलंगणामध्ये काम करत होते. त्यांना त्या ठिकाणच्या परिस्थितीची चांगली माहिती होती. त्यांनी तेलंगणा विधानसभा निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी घेतली. त्यानंतर त्याला आता फळही आले आहे. त्यामुळे ठाकरे यांचे काँग्रेसमधील राजकीय वजन वाढल आहे.
दिल्लीला रवाना
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह ठाकरे आता दिल्लीला गेले आहेत. या ठिकाणी ते काँग्रेसचे अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे यांची भेट घेणार आहे. या भेटीत तेलंगणाच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मंत्रिमंडळाबाहत चर्चा होणार आहे. यातही ठाकरे यांचे मतही महत्त्वाचे ठरणार आहे.