इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः ‘इंडिया’ आघाडीच्या उद्याच्या बैठकीत ममता बँनर्जीनंतर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी अगोदरच बैठकीत सामील होण्यास नकार दिल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी नकार दिला. त्यामुळे ६ डिसेंबर होणारी इंडिया आघाडीची ही बैठक रद्द करण्यात आली आहे.
तीन राज्यात काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर इंडिया आघाडीचे घटक पक्षांनी आता दूरी साधण्याचे संकेत दिले होते.त्यानंतर ही बैठक रद्द करण्यात आली. आता ही बैठक केव्हा होणार हे मात्र अजून निश्चित नाही.
‘इंडिया’ आघाडीची चौथी बैठक सहा डिसेंबरला दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी होणार होती. सर्व २८ विरोधी पक्षांना बैठकीसाठी बोलावले होते. पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर ‘इंडिया’आघाडीची ही पहिलीच बैठक होती. या बैठकीत निवडणूक निकालांवर चर्चा होणार होती. पण, ही बैठकच आता रद्द झाली. ‘इंडिया’ आघाडीची यापूर्वीची बैठक मुंबईत झाली. त्यावेळेस बैठकीत पाच समित्या स्थापन केल्या होत्या. यामध्ये प्रचार समिती, समन्वय आणि रणनीती समिती, मीडिया, सोशल मीडिया आणि संशोधन समिती यांचा समावेश आहे.
हे आहे कारण
चार राज्यात झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने इंडिया आघाडी म्हणून ही निवडणूक लढवली नाही. त्यामुळे इतर अनेक घटक पक्ष त्यावर नाराज आहे. काँग्रेससोबत आपण गेलो तर आपल्यालाही धक्का बसेल असे सर्वांना आता वाटायला लागले आहे. त्यातच तेलंगणामध्ये पक्ष विस्ताराच्या नादात केसीआरचे जे हाल झाले ते इंडिया आघाडीच्या आपले होईल असे प्रादेशिक पक्षांना वाटू लागले आहे. त्यामुळे आता ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे अंतर ठेवण्याच्या मूडमध्ये आहे.