मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगावचे माजी आमदार तथा महापौर रशीद शेख (६५) यांचे सोमवारी अकरा वाजेच्या सुमारास निधन झाले. ते मालेगाव विधानसभा मतदार संघाचे दोन वेळा आमदार होते. मालेगाव महानगर पालिकेचे महापौर पदाची धुरा त्यांनी सांभाळली, अलीकडेच राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला होता. ते आधी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष होते.
शेख यांची अंत्ययात्रा कै.खलील दादा यांचे घर ,गल्ली नं.१ हजार खोली येथून निघणार असून आयेशा नगर कब्रस्तान येथे सकाळी ११ वाजता दफन विधी होणार आहे. १९९९ मध्ये रशीद शेख यांनी मालेगावमधून २५ वर्षांहून अधिक काळ आमदार राहिलेल्या निहाल अहमद यांचा पराभव केल्यामुळे राज्यभर त्यांचे नाव चर्चेत होते.
१९९९ मध्ये आमदार म्हणून ते सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा भाग होते. २००४ मध्ये ते पुन्हा त्याच सत्ताधारी आघाडीचा भाग होते.२००९ मध्ये,विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री, महापौर अशी सर्व पदे भूषविली.