नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये त्यांना मिळालेल्या भेटवस्तू आणि स्मृतीचिन्हांच्या विस्तृत प्रदर्शनाबद्दल पोस्ट केले. या भेटवस्तू आणि स्मृतीचिन्हे भारतभरातील विविध कार्यक्रमांदरम्यान त्यांना भेट म्हणून देण्यात आली असून ती भारताच्या समृद्ध संस्कृती, परंपरा आणि कलात्मक वारशाचा दाखला आहेत, असे मोदी म्हणाले.
नेहमीप्रमाणे, या वस्तूंचा लिलाव केला जाईल आणि त्यातून मिळणारी रक्कम नमामि गंगे उपक्रमाला मदत म्हणून दिली जाईल असेही पंतप्रधान पुढे म्हणाले. जे नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टला वैयक्तिकरित्या भेट देऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी मोदी यांनी वेबसाइट लिंक देखील सामायिक केली आहे.
एका X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले; “आजपासून, @ngma_delhi येथील एका प्रदर्शनात मला अलिकडच्या काळात भेट म्हणून देण्यात आलेल्या भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हांची विस्तृत श्रेणी प्रदर्शित केली जाणार आहे. या भेटवस्तू आणि स्मृतीचिन्हे भारतभरातील विविध कार्यक्रमांदरम्यान त्यांना भेट म्हणून देण्यात आली असून ते भारताच्या समृद्ध संस्कृती, परंपरा आणि कलात्मक वारशाचा दाखला आहेत.
नेहमीप्रमाणे, या वस्तूंचा लिलाव केला जाईल आणि त्यातून मिळणारी रक्कम नमामि गंगे उपक्रमाला मदत म्हणून दिली जाईल.
या वस्तू मिळवण्याची तुम्हाला संधी आहे. अधिक जाणून घेण्यासाठी NGMA ला भेट द्या. जे वैयक्तिकरित्या भेट देऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी वेबसाइट लिंक शेअर करत आहे. pmmementos.gov.in”