गुरूवार, ऑक्टोबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

देशातील घरांच्या विक्रीत या शहरात झाली इतकी वाढ…बघा हा अहवाल..

डिसेंबर 4, 2023 | 4:19 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 33

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई- भारतातील आघाडीच्‍या आठ निवासी बाजारपेठांनी कॅलेंडर वर्षाच्‍या तिसऱ्या तिमाहीदरम्‍यान (जुलै ते सप्‍टेंबर २०२३) विक्रीमध्‍ये २२ टक्‍के आणि नवीन पुरवठ्यामध्‍ये १७ टक्‍क्यांची वाढ केल्याचे प्रॉपटायगर डॉटकॉमच्या अहवालातून निदर्शनास आले आहे. चेन्‍नई वगळता सर्व शहरांनी विक्रीत वाढीची नोंद केली, जेथे मुंबई महानगर क्षेत्र (एमएमआर) आणि पुणे यांचे एकूण आकारमानामध्‍ये जवळपास निम्‍मे योगदान होते.

आरईए इंडियाची मालकीहक्‍क असलेली आणि हाऊसिंग डॉटकॉम व मकान डॉटकॉमची मूळ कंपनी प्रॉपटायगर डॉटकॉम या आघाडीच्‍या डिजिटल रिअल इस्‍टेट ब्रोकरेज कंपनीने आपला अहवाल ‘रिअल इनसाइट रेसिडेन्शियल – जुलै-सप्‍टेंबर २०२३’ जारी केला. या अहवालामधून निदर्शनास येते की, निवासी सदनिकांची विक्री तिसऱ्या तिमाहीमध्‍ये गेल्‍या वर्षीच्‍या याच कालावधीमधील ८३,२२० युनिट्सवरून १,०१,२२० युनिट्सपर्यंत वाढली आहे.

प्रॉपटायगर डॉटकॉमच्या त्रैमासिक अहवालात दिल्ली-एनसीआर, एमएमआर, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, पुणे आणि अहमदाबाद या आठ प्रमुख गृहनिर्माण बाजारपेठांचा मागोवा घेण्‍यात आला आहे.

आरईए इंडियाचे सीएफओ आणि प्रॉपटायगर डॉटकॉमचे व्‍यवसाय प्रमुख श्री. विकास वाधवान म्‍हणाले, “अव्‍वल आठ शहरांमधील गृहनिर्माण बाजारपेठांनी विकासाची गती कायम ठेवली आहे. प्रबळ मागणीचे श्रेय सकारात्‍मक ग्राहक भावनेला जाते. वाधवान यांनी विक्रीमधील वाढीचे प्रमुख स्रोत म्‍हणून वाढती मागणी, वाढते डिस्‍पोजेबल उत्‍पन्‍न, स्थिर व्‍याजदर आणि नवीन गुंतवणूकदार मागणी यांसारख्‍या घटकांना निदर्शनास आणले.”

प्रॉपटायगर डॉटकॉम डेटामधून निदर्शनास येते की, अहमदाबादमधील वार्षिक गृहनिर्माण विक्रीत ३१ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह ७,८८० युनिट्सवरून १०,३०० युनिट्सपर्यंत वाढ झाली आहे. बेंगळुरूमधील विक्रीत ६० टक्‍क्‍यांच्‍या अधिकतम वाढीसह ७,८९० युनिट्सवरून १२,५९० युनिट्सपर्यंत वाढ झाली आहे. दिल्‍ली-एनसीआरने विक्रीमध्‍ये ५,४३० युनिट्सवरून ७,८०० युनिट्सपर्यंत ४४ टक्‍क्‍यांच्‍या वाढीची नोंद केली. हैदराबादमधील विक्रीत १०,५७० युनिट्सवरून १४,९९० युनिट्सपर्यंत ३४ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. कोलकातामधील विक्रीत ४३ टक्‍क्‍यांची वाढ दिसण्‍यात आली, ज्‍यामुळे सदनिकांच्‍या विक्रीत २,५३० युनिट्सवरून ३,६१० युनिट्सपर्यंत वाढ झाली आहे. मुंबईतील विक्रीत २८,८०० युनिट्सवरून ३०,३०० युनिट्सपर्यंत फक्‍त ५ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे, ज्‍यासाठी उच्‍च मूल्‍य कारणीभूत आहे. पुण्‍यातील विक्रीत १५,७०० युनिट्सवरून १८,५६० युनिट्सपर्यंत १८ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. चेन्‍नई ही एकमेव बाजारपेठ आहे, जेथे विक्रीत १२ टक्‍क्‍यांची घट झाली आहे, ज्‍यामुळे सदनिकांच्‍या विक्रीत ४,४२० युनिट्सवरून ३,८७० युनिट्सपर्यंत घट झाली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भररस्त्यात गाडा लावून फळविक्री…पोलिसांनी केली दोन फळविक्रेत्यांवर कारवाई

Next Post

अपघातांची मालिका सुरूच…वेगवेगळ्या भागात झालेल्या अपघातात तीन पादचा-यासह एका दुचाकीस्वाराचा मृत्यू

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
accident 11

अपघातांची मालिका सुरूच…वेगवेगळ्या भागात झालेल्या अपघातात तीन पादचा-यासह एका दुचाकीस्वाराचा मृत्यू

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011