इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
हैदराबादः तेलंगणातील डुंडीगल येथे आयएएफचे पिलाटस ट्रेनर विमान कोसळले आहे. या घटनेत दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला. अपघाताचे भीषण दृश्यही समोर आले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. हवाई दलाने या प्रकरणी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत.
भारतीय हवाई दलाने हैदराबादमध्ये एक दुःखद अपघात झाल्याची पुष्टी केली. तेलंगणातील डुंडीगल येथे पिलाटस प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थी विमान कोसळले. विमानातील दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला. अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. या अपघाताबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले, की हैदराबादजवळ झालेल्या या अपघातामुळे मी दु:खी झालो आहे. दोन वैमानिकांना आपला जीव गमवावा लागला हे अत्यंत दु:खद आहे. या दुःखाच्या प्रसंगी माझे विचार शोकाकुल कुटुंबियांसोबत आहेत.
हैदराबादहून नियमित प्रशिक्षण उड्डाण करताना आज सकाळी Pilatus PC ७ Mk II विमान क्रॅश झाले. विमानातील दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत. सोमवारच्या दुर्घटनेच्या सहा महिने आधी म्हणजे एक जून रोजी कर्नाटकातील चामराजनगर भागात हवाई दलाच्या विमानाला अपघात झाला होता. या अपघातात दोन्ही पायलट थोडक्यात बचावले.