येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लव्ह जिहादच्या नावाखाली अनेक गैरकृत्य सुरु असून या गैर कृत्यांना आळा घालण्यात यावा या मागणीसाठी येवला शहरात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
हिंदू मुलींवर होणारे अत्याचार करणाऱ्या नराधमांस व धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तींना योग्य ती शिक्षा मिळावी. तसेच या सर्व घटना घडविणाऱ्या मुख्यसुत्रधारास प्रशासनाने समोर आणून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
विंचूर चौफुली येथून निघालेल्या मोर्चात महिलांसह मोठ्या संख्येने सकल हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील विविध भागात फिरून मोर्चाचे रूपांतर स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या मैदानावर सभेत झाले.