इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कुणाचं उत्तरेवर राज्य तर कुणाचं दक्षिण भारतावर… महाराष्ट्र आता निर्णायक टप्प्यावर उभा आहे. हीच वेळ आहे साऱ्या हिंदभूमीला राजकीय कलगीतुऱ्यातून बाहेर काढून, ‘राज’धर्माची जाणीव करून देऊन नवी दिशा देण्याची अन् महाराष्ट्र हि भूमिका कायम निभावत आला आहे ! असे ट्वीट मनसेने केले असून ते चांगलेच चर्चेत आहे. चार राज्यांच्या निवडणुक निकाल आल्यानंतर ही बोलकी प्रतिक्रिया मनसेने दिली आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड व तेलंगणा या चार राज्याच्या निवडणुकीत चारपैकी तीन राज्यांत भाजपची एकहाती सत्ता आली, तर तेलंगणा या एकमेव राज्यांत काँग्रेसचा विजय झाला. त्याअगोदर काँग्रसेने कर्नाटकमध्ये विजय मिळवला. हिंदी भाषिक पट्यात भाजप जोरात आहेत. तर दक्षिण भारतात काँग्रेसकडे दोन राज्य आहे. त्यामुळे मनसेने ही पोस्ट टाकली आहे.
महाराष्ट्रात भाजप, शिंदे व अजित पवार गट महायुतीत आहे तर महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादीचा शरद पवार व शिवसेनाच उध्दव ठाकरे गट आहे. तर मनसे स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या तयारी आहे. त्यामुळे मनसेने ही पोस्ट टाकून लक्ष वेधले आहे.