इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दौंड शुगर प्रा. लिमिटेड या खासगी साखर कारखान्यात गरम पाण्याने भाजून दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. गणेश सीताराम शिंदे आणि संदीप कुंडलिक गरदडे अशी त्या दोघांची नावे आहेत.
हे कामगार कारखान्यात उसाचा रस तयार होते. वाफ तयार होण्याच्या ठिकाणी हे दोन कामगार पाणी मारत होते. संदीप पाणी मारत असताना पाय घसरून गरम पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या गणेश शिंदे याचाही त्याला वाचवताना मृत्यू झाला. हा कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मालकीचा आहे.
मोळी कार्यक्रमाला विरोधामुळे चर्चेत
या कारखान्याच्या मोळीपूजनाच्या कार्यक्रमाला अजित पवार यांनी येऊ नये, अन्यथा आंदोलन करू असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला होता. त्या वेळी हा कारखाना चर्चेत आला होता. अजित पवार यांनी विरोध केल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मोळी टाकण्यात आली होती.