इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय संघाने टी२० च्या पाचव्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत ही मालिका ४-१ फरकाने जिंकली. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर ६ धावांनी विजय मिळवला आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १६१ धावांचे आव्हान दिले. पण, ऑस्ट्रेलियाला मात्र २० १५४ धावाच करता आल्या. त्या करतांना त्यांनी ८ गडी गमावले.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून भारतीय संघाला बॅटिंग दिली. त्यानंतर भारतीय संघाने २० ओव्हरमध्ये ८ विकेट्स गमावत १६० धावा केल्या. जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या सलामी जोडीने अनुक्रमे २१ आणि १० धावा केल्या. श्रेयस अय्यर याने टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा केल्या. श्रेयसने ३७ बॉलमध्ये ५३ रन्स केल्या. कॅप्टन सूर्यकुमार यादव ५ आणि रिंकू सिंह ६ रन्स करुन तंबूत परतले. विकेटकीपर जितेश शर्मा याने २४ आणि अक्षर पटेल याने ३१ धावा केल्या. तर रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंह या दोघांनी २-२ धावा केल्या.
असा जिंकला सामना
ऑस्ट्रेलियाला २० व्या ओव्हरमध्ये विजयासाठी १० धावांची गरज होती. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मॅथ्यु वेड बँटींगमसाठी उभा. ही शेवटची ओव्हर अर्शदीपने देण्यात आली. त्याने मॅथ्यु वेड याला आऊट केले त्यानंतर भारतीय संघाच्या जिंकण्याच्या आशा वाढल्या. त्यानंतर या ओव्हरमध्ये फक्त ३ धावा दिल्या व भारतीय संघाला विजय मिळाला.या सामन्यात भारतीय संघाच्या मुकेश कुमार याने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंह या दोघांनी प्रत्येकी २ फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर अक्षर पटेल याने १ विकेट घेतली.