नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी नाशिक आणि क्रीडा उपसंचालक नाशिक विभाग यांच्या वतीने नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलच्या मैदानावर ६७ वी राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरवात झाली
या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री ना.छगन भुजबळ, नाशिकचे जिल्हाधकारी जलज शर्मा, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिंपियन खेळाडू कविता राऊत- तुंगार यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी सौ.सुनंदा पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, स्कूल गेम्स फेडरेशनचे निरीक्षक के. एस.मूर्ती आणि कुं. कनक चातूर्धर छत्रपती पुरस्कार प्राप्त आनंद खरे,अविनाश खैरनार, अंबादास तांबे आदी मान्यवर उपस्थित होते. ना.छगन भुजबळ यांनी खेळाडूंना शुभेच्या दिल्या.आणि क्रीडा विभागासाठी भरघोस सहकार्य मिळेल अशी ग्वाही दिली. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनीही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. प्रास्तविक आणि स्वागत रवींद्र नाईक यांनी केले तर आभार सौ. सुनंदा पाटील यांनी केले.
या स्पर्धेत २८ राज्यांचे मुलांचे आणि २८ राज्यांचे मुलींचे संघ सहभागी झाले आहेत. या सर्व संघांची आठ गटात विभागणी करण्यात आली आहे. पहिले दोन दिवस या आठ गटामध्ये गटवर साखळी सामने होणार आहेत. या गटवर साखळी सामन्यातील निकालानंतर प्रत्येक गटातून पहिले दोन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. आज सकाळपासून या साखळी समन्यांना सुरवात झाली महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाचा समावेश “अ” गटात करण्यात आला आहे. या गटात पंजाब आणि ओरिस या अन्य दोन संघांचा समावेश आहे.
तर मुलींच्या संघाचा समावेश “क” गटात करण्यात आला आहे. या गटात जम्मू-काश्मीर आणि बिहार या संघांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे दोन्हीही संघ साखळी सामन्यात चांगली कामगीरी करून पहिल्या क्रमांकाने बाद फेरीत प्रवेश मिळवितील असा विश्वास या संघांचे कर्णधार आणि प्रशिक्षक यांनी व्यक्त केला आहे.
आज झालेल्या साखळी स्पर्धेत मुलांमध्ये पंजाब, बिहार, केंद्रिय विद्यालय, हरियाना,तेलंगणा, छत्तीसगड, चंदीगड आणि विद्या भारती यांनी आपल्या पहिल्या साखळी सामन्यात विजय प्राप्त करून चांगली सुर वात केली. मुलींमध्ये चंदीगड, छतीसगड, तेलंगणा, बिहार, राजस्थान,केरळ ओरिसा या संघांनी आपल्या पहिल्या सामन्यात विजय प्राप्त करून चांगली सुरवात केली आहे. महाष्ट्राच्या मुलीच्या संघाने आपल्या पहिल्या सामन्यात पहिल्या सत्रात बिहार संघावर आघाडी मिळवत आपले विजयी अभियानास सुरवात केली आहे.