माणिकराव खुळे
सध्या उत्तर भारतात जम्मू-काश्मीर पर्वतीय क्षेत्रात पश्चिमेंकडून पूर्वेकडे जाणाऱ्या जमिनीवरच्या (पश्चिमी झंजावात) चक्री वादळातून जबरदस्त बर्फबारी होत आहे, तर अडीच हजार किमी. अंतरावर दक्षिणेत पूर्वेकडून पश्चिमेकडे येणाऱ्या ‘ मिचॉन्ग ‘ समुद्री चक्रीवादळातून चेन्नई-सीमांध्र पूर्व किनार पट्टी भागात जोरदार पाऊस होत आहे.
विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात आज रविवार पासूनच ढगाळ वातावरण पूर्णपणे निवळून हळूहळू थंडीला सुरवात झाली आहे. महाराष्ट्रातील लातूर नांदेड परभणी हिंगोली व संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरणसहीत तूरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. व शुक्रवार .८ डिसेंबरपासून या ठिकाणीही ढगाळ वातावरण पूर्णपणे निवळून हळूहळू थंडीला येथेही सुरवात होण्याची शक्यता जाणवते.
लाल कांदा काढणी, उन्हाळ कांदा रान मशागतव लागवड, गहू रान मशागत व पेरणी, सुरु ऊस लागवड इ.सारखी शेतकामे उत्तम वाफस्यावर उरकण्याचे, तसेच ज्वारी व हरबरा पिकांची खारव-ओघळणी सारखे सिंचनाचे, नियोजन करण्यास आता हरकत नसावी, असे वाटते.
सध्या विशेष एव्हढेच!
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd.)
IMD Pune.