इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकालाचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगडमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली. तर तेलंगणामध्ये काँग्रेसने बहुमताचा आकडा पार आहे. पाचपैकी भाजपला तीन राज्यात फायदा झाला आहे. मध्यप्रदेशमध्ये पुन्हा सत्ता मिळाली तर राजस्थान व छत्तीसगड हे दोन राज्यात काँग्रेसला धक्का देऊन सत्ता मिळाली आहे. तर काँग्रेसची राजस्थान व छत्तीसगडमध्ये असलेली सत्ता गेली असून तेलंगणा मात्र मिळाले आहे.
राजस्थानमध्ये १९९ जागा असून त्यात भाजप ११६, काँग्रेस ६७ तर इतर १६ जागेचवर हे पक्ष आघाडीवर आहे. तर मध्यप्रदेशमध्ये २३० जागेवर भाजप १६३, काँग्रेस ६६, इतर १ जागेवर हे पक्ष आघाडीवर आहे. छत्तीसगडमध्ये ९० जागा असून त्यात भाजप ५४, काँग्रेस ३६ इतर ० आघाडीवर आहे. तेलंगणामध्ये ११९ जागा असून काँग्रेस ६४, बीएसआर ३९, भाजप ८ इतर ८ जागेवर आघाडीवर आहे.
पाच राज्याच्या निवडणुकीत मध्य प्रदेशमध्ये एक्झिट पोलमध्ये काँग्रेसची सरशी असेल असे सांगितले जात असतांना येथे भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे.
मध्यप्रदेशमध्ये मामाजी जादू चालली
भाजपचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी जाहीर केलेल्या लाडली लक्ष्मी योजना, लाडली बहना योजनेची जादू या ठिकाणी चालल्याचे चित्र आहे. मध्यप्रदेशमध्ये ज्योतिराज सिंधीया यांनी भाजपमध्ये केलेला पक्षप्रवेशही काँग्रेसचा झटका देऊन गेला तर भाजपला त्याचा फायदा झाला आहे.२०१८ मध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेत आले होते. पण, काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर हे सरकार पडले. त्यामुळे जनता पुन्हा काँग्रेसला साथ देईल असे बोलले जात होते. पण, या निवडणुकीत मतदारांनी शिवराजसिंह चौहान यांना साथ दिली. मतमोजणीच्या कलानुसार ५० टक्के महिला भाजपबरोबर असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी आखलेली रणनिती येथे काम करुन गेली.या निवडणुकीत काँग्रेसनेही मोठे आश्वासन दिले. पण, जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. या निवडणुकीत शिवराजसिंह चौहान यांनाच साथ दिली. काँग्रेसला या राज्यात मोठी आशा होता. पण, त्यांना अपयश आले. कमलनाथची साथ येथील जनेला न देता कमलला मत दिले.
राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी
चार राज्याच्या निवडणुकाचे निकाल जवळपास स्पष्ट झाल्यानंतर राजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. भाजपने १९९ जागापैकी ११४ जागेवर आघाडी येथे घेतली आहे. त्यामुळे बहुमतांच्या आकड्यापेक्षा या जास्त जागा आहे. त्यामुळे भाजपचे सरकार आता या राज्यात स्थापन होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधीया, जयपुर राजघराण्यातील दीया कुमारी, खासदार बालकनाथ, व राजस्थान भाजप प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांचे नावे चर्चेत आहेत.
आता राजस्थानमध्ये स्थानिक बडया नेत्याला मुख्यमंत्री केले जाते, की दिल्लीतून मुख्यमंत्री पाठवला जातो, हे आता पक्षश्रेष्ठी ठरवणार आहेत. राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सत्तांतर होण्याची परंपरा कायम राहिली आहे. राजस्थानमध्ये २०० पैकी १९९ जागांसाठी मतदान झाले. बहुमतासाठी १०० जागा आवश्यक आहेत. या जादुई आकृतीबंधात काँग्रेस खूप मागे पडली असून गेहलोत यांची जादू पूर्णपणे फसली आहे त्यांच्या पारडयात ७१ जागाच अद्यापर्यंत आल्या आहे.
काँग्रेसकडून रेवंत रेड्डी यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत
तेलंगणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तेलंगणाची स्थापना झाल्यानंतरची ही तिसरी निवडणूक आहे. या निवडणुकीत केसीआर मुख्यमंत्री म्हणून हॅट्ट्रिक करण्यात अपयशी ठरले आहे. दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या केसीआर यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. तेलंगणात केसीआर यांच्या ४० तर काँग्रेसला ६४ जागा मिळताना दिसत आहेत. याठिकाणी काँग्रेसकडून रेवंत रेड्डी यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे.राज्यातील विधानसभा निवडणूकीत रेवंत रेड्डी हे प्रचाराच्या केंद्रस्थानी होते. रेवंत रेड्डी काँग्रेसचे खासदार आहे. आता त्यांचा प्रवास खासदार ते मुख्यमंत्री असा होण्याची शक्यता आहे. ५४ वर्षीय रेड्डी काँग्रेसची मोठी ताकद आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून त्यांचा प्रवास सुरु झाला. त्यानंतर ते टीडीएफमध्ये गेले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन आपले स्थान भक्कम केले आहे.
छत्तीसगडमध्ये एक्झिट पोलचे अंदाज खोटे…
छत्तीसगडमध्ये ९० जागेपैकी भाजपने ५४ जागेवर आघाडी घेत सरकार स्थापनेचा दावा केला आहे. या राज्यात काँग्रेसला ३३ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. छत्तीसगडमधील बहुतांश राजकीय पंडितांचे भाकीत चुकीचे ठरताना दिसले. काँग्रेस पुन्हा एकदा राज्यात पुनरागमन करणार असेच बोलले जात होते. पण, भाजपने मोठा धक्का दिला. बघेल यांच्या योजना चांगल्या होत्या; पण त्यांची अंमलबजावणी नीट झाली नाही. टीएस सिंह देव यांची उपमुख्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात विलंब झाला. काँग्रेस पक्षाला उशिरा जाग आली. भाजपने आपल्या पक्षात बदल केले. छत्तीसगडमध्ये निवडणुकीचे वातावरण असताना महादेव बेटिंग अॅपच्या मुद्द्यामुळे राज्यातील राजकीय तापमान वाढले होते. याशिवाय या निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाला अंतर्गत कलहही कारणीभूत होता. छत्तीसगडमधील कथित दारू घोटाळ्याच्या आरोपांमुळे राज्य सरकारची प्रतिमाही डागाळली आणि या निवडणुकीत नुकसान झाले. बघेल हे खूपच आत्मविश्वासू दिसत होते. राज्यात काँग्रेसचा विजय झाल्याचा दावा ते सातत्याने करत होते. बघेल यांच्या या अतिआत्मविश्वासाने छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारलाही हानी पोहोचवली.