नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरात सोनसाखळी चोरी करणारे रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार जेरबंद करून त्यांचेकडुन अवैध अग्निशस्त्रासह सोनसाखळी चोरीचे १३ गुन्हे उघडकीस आले. गुन्हे शाखा युनिट -१ ने ही कामगिरी केली.
या १३ सोनसाखळीचे गुन्हेमध्ये उपनगर पो.स्टे कडील ६, नाशिकरोड पो.स्टे कडील २, म्हसरूळ पो.स्टे कडील २, पंचवटी पो.स्टे कडील १, मुंबईनाका पो.स्टे कडील १, इंदिरानगर पो. स्टे कडील १ असे गुन्हे उघडकीस आले. गजाआड केलेल्या चोरांकडून १९० ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल किंमत १२ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गुन्हेशाखा युनिट कमांक १ चे पोलीस अधिकारी व अंमलदार नाशिक शहरामध्ये घडणा-या सोनसाखळी चोरीच्या गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्यात त्यांना यश मिळाले. या कारवाईत महेश चंदु जाधव, वय-२४वर्षे, रा-चेहडी पपिंग नाशिकरोड, नाशिक, भारत उर्फ सोनु मनोहर चावरे, वय-३१वर्षे, रा-लाखलगाव ता. जि. नाशिक असे असल्याचे सांगुन त्याचेकडुन ०१ देशी बनावटीचे पिस्तोल, ०५ जिवंत काडतुसे, ०१ चाकु, ०१ मोटार सायकल असा ८३ हजाराचा किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला. आडगाव पोलीस ठाणे येथे सदर आरोपीतांविरूध्द भा. ह. का कलम ३/२५, ५/२५ व म.पो.का कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपीतांना अटक करून त्यांच्याकडे चैन स्नेचिंगचे अनुषंगाने सखोल चौकशी केली असता आरोपी महेश जाधव याने चैन स्नेचिंग केल्याची कबुली देवुन सोने आरोपी सोनु चावरे याचे मार्फत विक्री केल्याचे कबुली दिली. त्यावरून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सपोनि हेमंत तोडकर यांच्यासह पोलिसांनी ही कामगिरी केली.