इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल येण्यास सुरुवात झाली असून चार राज्यापैकी तीन राज्यात भाजपने आघाडी घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोशल मीडियावर एक ट्विट करत एक अकेला सब पर भारी! असे म्हटले आहे.
चार राज्यात झालेल्या निवडणुकीत मुख्यमंत्रीचा कोणताच चेहरा नव्हता. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नावावर ही निवडणूक झाली. त्यामुळे केंद्रीय मंत्री इराणी यांनी ही पोस्ट टाकत एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदीचा एक व्हिडिओ सोबत अपलोड केला आहे.
या राज्यात तेलंगणा सोडल्यास काँग्रेसला तीन राज्यात मोठा फटका बसला आहे. राजस्थानमध्ये १९९ जागा असून त्यात भाजप ११०, काँग्रेस ७३ तर इतर १६ जागेचवर हे पक्ष आघाडीवर आहे. तर मध्यप्रदेशमध्ये २३० जागेवर भाजप १६१, काँग्रेस ६६, इतर ३ जागेवर हे पक्ष आघाडीवर आहे. छत्तीसगडमध्ये ९० जागा असून त्यात भाजप ५४, काँग्रेस ३४ इतर २ आघाडीवर आहे. तेलंगणामध्ये ११९ जागा असून काँग्रेस ६५, बीएसआर ३९, या जागेवर आघाडीवर आहे. ही सर्व निकालाचे आकडे बघितल्यानंतर या ठिकाणी मोदीची जादू चालल्याचे दिसत आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री यांनी ही पोस्ट केली आहे.