इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पाच राज्याच्या निवडणुकीत मध्य प्रदेशमध्ये एक्झिट पोलमध्ये काँग्रेसची सरशी असेल असे सांगितले जात असतांना येथे भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. या राज्यात २३० जागापैकी आतापर्यंत १५८ जागावर भाजप आघाडीवर आहे. तर काँग्रेसला ६९ जागा पदरात पडतांना दिसत आहे.
भाजपचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी जाहीर केलेल्या लाडली लक्ष्मी योजना, लाडली बहना योजनेची जादू या ठिकाणी चालल्याचे चित्र आहे. मध्यप्रदेशमध्ये ज्योतिराज सिंधीया यांनी भाजपमध्ये केलेला पक्षप्रवेशही काँग्रेसचा झटका देऊन गेला तर भाजपला त्याचा फायदा झाला आहे.
२०१८ मध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेत आले होते. पण, काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर हे सरकार पडले. त्यामुळे जनता पुन्हा काँग्रेसला साथ देईल असे बोलले जात होते. पण, या निवडणुकीत मतदारांनी शिवराजसिंह चौहान यांना साथ दिली. मतमोजणीच्या कलानुसार ५० टक्के महिला भाजपबरोबर असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी आखलेली रणनिती येथे काम करुन गेली.
या निवडणुकीत काँग्रेसनेही मोठे आश्वासन दिले. पण, जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. या निवडणुकीत शिवराजसिंह चौहान यांनाच साथ दिली. काँग्रेसला या राज्यात मोठी आशा होता. पण, त्यांना अपयश आले. कमलनाथची साथ येथील जनेला न देता कमलला मत दिले.