इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकालाचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगडमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली. तर तेलंगणामध्ये काँग्रेसने बहुमताचा आकडा पार आहे. पाचपैकी भाजपला तीन राज्यात फायदा झाला आहे. मध्यप्रदेशमध्ये पुन्हा सत्ता मिळाली तर राजस्थान व छत्तीसगड हे दोन राज्यात काँग्रेसला धक्का देऊन सत्ता मिळाली आहे. तर काँग्रेसची राजस्थान व छत्तीसगडमध्ये असलेली सत्ता गेली असून तेलंगणा मात्र मिळाले आहे.
राजस्थानमध्ये १९९ जागा असून त्यात भाजप ११४, काँग्रेस ७० तर इतर १५ जागेचवर हे पक्ष आघाडीवर आहे. तर मध्यप्रदेशमध्ये २३० जागेवर भाजप १६६, काँग्रेस ६२, इतर २ जागेवर हे पक्ष आघाडीवर आहे. छत्तीसगडमध्ये ९० जागा असून त्यात भाजप ५३, काँग्रेस ३५ इतर २ आघाडीवर आहे. तेलंगणामध्ये ११९ जागा असून काँग्रेस ६४, बीएसआर ४०, भाजप ८ इतर ५ जागेवर आघाडीवर आहे.
विविध एक्झिट पोलचे होते हे अंदाज
विविध एक्झिट पोलनुसार पाच पैकी एकाच राज्यात भाजपची सत्ता येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर चार राज्यापैकी ३ राज्यात काँग्रेसला जास्त संधी आहे. या पाच राज्यात राजस्थानमध्ये २०० जागा आहे. तर मध्य प्रदेश – २३०, तेलंगणा – ११९, छत्तीसगड – ९०, मिझोरम – ४० जागा आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसला पुन्हा संधी मिळणार आहे. या ठिकाणी भाजप ३०-३५, काँग्रेस ४०-४५ असा अंदाज आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसला ९०-१००, भाजप १००-११० तर इतर पक्षांना १० च्या आसपास जागा दाखवल्या आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता येण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये आहे. काँग्रेसला १११- १२१, भाजप १०६- ११६ आणि इतर ६ असा अंदाज एक्झिट पोलनुसार सांगण्यात आले आहे. तेलंगणामध्ये एक्झिट पोलनुसार काँग्रेस ४९-५९, बीआरएस ४८-५८, भाजप ५-१० आणि इतर ६ असा अंदाज वर्तवला आहे. मिझोरम एमएनएफ १५-२१, झेडपीएम – १२-१८, काँग्रेस – २-८ तर इतर पक्षाला पाच जागा दाखवण्यात आल्या आहे.आता हा अंदाज किती खरा होता हे लवकरच स्पष्ट होणार आहे.