शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईत या विभागात स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ

डिसेंबर 3, 2023 | 1:43 am
in राज्य
0
GAWJA3UakAAxYNG e1701538888302 1140x570 1


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- स्‍वच्‍छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात (वॉर्ड) व्यापक स्तरावर संपूर्ण स्वच्छता (डीप क्लिनिंग) मोहीम राबविण्याचे नियोजन केले आहे. त्‍यासाठीची प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) देखील तयार करण्‍यात आली आहे. या ‘डीप क्लिनिंग’ मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्‍या प्रमुख उपस्थितीत उद्या रविवार, दिनांक ३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ७:०० वाजता जी उत्‍तर विभागातील धारावीतून करण्यात येणार आहे. तसेच याच दिवशी डी विभागातदेखील संपूर्ण स्वच्छता मोहीम सकाळी १०:०० राबवली जाणार आहे.

राज्‍याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री श्री. दीपक केसरकर, कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण स्वच्छता मोहिमेत महानगरपालिकेचे सुमारे ५ हजार अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकदेखील सहभागी होणार आहेत.

या विशेष मोहिमेअंतर्गत निवडलेल्‍या विभागातील रस्ते – पदपथ धूळमुक्त करण्याबरोबरच बेवारस वाहनांची विल्हेवाट, विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई, सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता, उद्यान – क्रीडांगणांची निगा, कर्मचारी वसाहतींमध्ये स्वच्छता, फेरीवाला विरहित क्षेत्र, राडारोडामुक्त परिसर, केबल्स व वायर्स यांचे जाळे हटवणे आदी कार्यवाही केली जाणार आहे. या स्वच्छ‍ता मोहिमेत लोकप्रतिनिधींसह, समाजातील ख्यातनाम व्यक्ती, उद्योजक, ज्येष्ठ नागरिक, महाविद्यालयीन तरूण, शालेय विद्यार्थी, अशासकीय संस्था – संघटना आदींनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या विशेष मोहीमेविषयीचा तपशील देताना उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्रीमती चंदा जाधव म्हणाल्या की, डिसेंबर २०२३ आणि जानेवारी २०२४ या दोन महिन्‍यातील प्रत्‍येक शनिवारी राबविण्‍यात येणा-या ‘डीप क्लिनिंग’ मोहिमेसाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) देखील तयार करण्‍यात आली आहे. त्‍यानुसार, महानगरपालिकेच्‍या विविध विभागातील अधिकारी – कर्मचा-यांच्‍या जबाबदारीचे वाटप करण्‍यात आले आहे. त्‍यानुसार, प्रत्येक परिमंडळातील एक विभाग (वॉर्ड) निवडून व्‍यापक स्‍तरावर व सखोल, सर्वांगीण स्‍वच्‍छता केली जाणार आहे. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत ही मोहीम सुरू राहील. विभागाचे सहायक आयुक्त साप्ताहिक कार्यक्रमासाठी त्यांच्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रांची नावे निश्चित करतील. शनिवारी सकाळी सामूहिक स्वच्छता मोहिमेला सुरुवात होण्यापूर्वी त्या भागातील सर्व रस्ते, गल्ल्या संबंधित कर्मचा-यांकडून नियमित कामकाजाप्रमाणे स्वच्छ करण्यात येतील. स्वच्छता मोहिमेदरम्यान वाहतूक विभाग, मलनिस्सारण विभाग, पर्जन्य जलवाहिन्या विभाग आदी आवश्यक अतिरिक्त वाहने आणि संयंत्रे पुरवतील. तर अतिक्रमण निर्मूलन विभाग विनापरवाना जाहिरात फलक, पोस्टर्सवर आदींवर कारवाई करेल. तसेच परिसरातील बेवारस वाहने हटवण्यासाठी वाहतूक पोलिसांची मदत देखील घेण्‍यात येईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे प्रधानमंत्री ४ डिसेंबर रोजी करणार अनावरण

Next Post

भाजपची हिंदी भाषिक पट्टात मुसंडी….दक्षिणेत मात्र काँग्रेसला यश

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
Untitled 18

भाजपची हिंदी भाषिक पट्टात मुसंडी….दक्षिणेत मात्र काँग्रेसला यश

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011