नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- येथील भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुन्या नाशकातील चौक मंडई परिसरात दोन युवकांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसण मारामारी व दगडफेकीत झाले. त्यानंतर काही युवकांनी गैर कायद्याच्या मंडळीना सोबत घेत परिसरातील वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.
याबाबत माहिती कळताच स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. यावेळी तोडफोड करणाऱ्या काही संशयतांना देखील ताब्यात घेण्यात आले.
रस्त्यावरील दहशत माजवण्याचे काम अशा टवाळखोरांकडून वारंवार होत असल्याने सर्वसामान्यांनी या संशयीतांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.