इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
समृद्धी महामार्गाच्या वैजापूर येथील जांबरगाव टोल नाक्याजवळ १५ ऑक्टोंबरला ट्रॅव्हल्स बस व ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात १३ जण ठार तर २३ जण जखमी झाले आहे. ही ट्रव्हल्स बस नाशिकची होती. बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गाचे दर्शन करून ती पुन्हा नाशिककडे परत येत होती. त्यावेळेस हा अपघात झाला होता. या ट्रव्हल्स बसने ट्रकला मागून धडक दिल्याने अपघात झाला. आता या ट्रव्हल्स बसबाबतच आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी याबाबात सांगितले की, बसचा साटाच बनावट होता. कालबाहय झालेली बस मॅाडीफाय करुन वापरली जात होती. या बसच्या चेसिस नंबरमध्ये सुध्दा बदल करण्यात आली होती. त्यामुळे मालक व चालक या दोघांविरुध्द सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असा झाला होता अपघात
नाशिक येथे राहणारे ३५ भाविक खासगी टेम्पो ट्रॅव्हल्सने बुलढाणा येथे बाबा सैलाणीच्या दर्शनासाठी गेले होते. वापस येतांना समृद्धी महामार्गावर (वैजापूर) अगरसायगाव परिसरात रात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान ट्रकला पाठीमागून धडक देऊन भीषण अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच तात्काळ दोन रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचल्या. या अपघातातील सर्व रुग्णांना उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
हा झालेला अपघात इतका भीषण होता की, यामध्ये १३ जणांचा दुदैर्वी मृत्यू झाला. त्यात एका ६ वर्षाच्या चिमुकलीचा देखील समावेश होता. तर यात अन्य २३ जण जखमी झाले. काही गंभीर जखमी अवस्थेत आहे. या जखमींना तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. ही घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य केले.