गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये शालेय राष्ट्रीय खो-खो स्पर्धेला उद्यापासून सुरुवात…..महाराष्ट्रला सुवर्णपदकाची संधी

by India Darpan
डिसेंबर 2, 2023 | 6:08 pm
in राज्य
0
Sushma Chaudhari Captain 2

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इडिया यांच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक आणि नाशिक विभाग क्रीडा उपसंचालक यांच्या वतीने नाशिकमध्ये नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित ६७ व्या शालेय खो-खो स्पर्धेला उद्या सकाळी सुरुवात होणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या यजमान महाराष्ट्राच्या मुलांच्या आणि मुलीच्या संघाचा चांगला सराव झाला आहे. संघातील सर्वच खेळाडू दर्जदार असून या स्पर्धेत महाराष्ट्रचे संघ नक्कीच सुवर्णपदकाचा दुहेरी मुकुट मिळवेल असा विश्वास मुलीच्या संघाची कर्णधार सुषमा चौधरी हिने व्यक्त केला. महाराष्टाच्या दोन्हीही संघाचे दहा दिवसाचे सराव शिबीर नाशिक येथेच आयोजित करण्यात आले होते. या संघाचे शिबीर प्रशिक्षक सत्येन जाधव आणि गुरुदत्त चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.

महाराष्ट्राच्या मुलीच्या संघाच्या कर्णधारपदी नाशिकच्या सुषमा चौधरी तर मुलांच्या कर्णधारपदी धारशिवच्या राज जाधव यांची निवड झाली आहे. मुलींच्या संघामध्ये सुषमा चौधरी (कर्णधार), रोहिणी भवर दोघीही नाशिक, सानिका चाफे, धनश्री तामखडे, विद्या तामखडे, राजेश्वरी आमणे, अमृता पाटील पाचही कोल्हापूर, शीतल वाघ (पुणे),प्राजक्ता बनसोडे, श्रेया चव्हाण दोघीही सोलापूर, मोनिका सादमे (गडचिरोली),गायत्री बोरकर (बीड) यांचा समावेश आहे तर मुलांच्या संघामध्ये राज जाधव (कर्णधार) धाराशिव,भावेश माशेरे, शंकर यादव, तन्मय शेवाळे, नरेश चांदणे चौघेही पुणे, विलास वळवी (धाराशिव), सुदर्शन चव्हाण (मुंबई), प्रताप तुपे (छ. संभाजी नगर), विजय शिंदे (नाशिक), कृष्णा बनसोड (सोलापूर), राजू पाटील (कोल्हापूर),शैलेश कोरेटे (गडचिरिली) यांचा समावेश आहे. तर प्रशिक्षक म्हणून सत्येन जाधव, गुरुदत्त चव्हाण, तर व्यवस्थापक म्हणून मनीषा मानकर ही जबाबदारी पार पाडत आहेत.

मॅटवर स्पर्धा होणार :- या स्पर्धेसाठी चार अद्यावत मॅट चे चार क्रीडांगणे तयार करण्यात अली आहेत. या स्पर्धेत २९ राज्यांचे संघ सहभागी झाले असून बहुतेक संघांचे आगमन झाले आहे तसेच पंच, व्यवस्थापक, प्रशिक्षक, पदाधिकारी हे देखील उपस्थित झाले आहेत. या स्पर्धा लीग पद्धतीने आणि त्यांनंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहेत. त्याप्रमाणे भाग्यपत्रक तयार करण्यात आले आहे.

निवास आणि भोजन स्थानिक प्रवास व्यवस्था :- खेळाडूं, प्रशिक्षिक, व्यवस्थापक पदाधिकारी यांची निवास आणि भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे. संपूर्ण भारतातून येणाऱ्या खेळाडूंसाठी नाशिक रोड रेल्वे स्टेशन पासून ते निवास स्थळापर्यंत बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन उद्या ३ डिसेंबर रोजी होणार असून स्पर्धा दिनांक ३ ते ७ डिसेंबेरपर्यंत सुरू राहणार आहेत. स्पर्धेचा कालावधी सकाळी ८.०० ते ११ आणि दुपारी ०३.३० ते रात्री ०८.०० असा असणार आहे.

या स्पर्धेची तांत्रिक बाजू स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने नियुक्त केलेले अधिकृत पंच पार पडणार आहेत. स्पर्धेत लाईव गुणफलक असणार आहे. तर या स्पर्धेच्या प्रत्येक सामन्याचे थेट प्रक्षेपण यू ट्यूब चॅनलवर केले जाणार आहे. या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन व्हावे यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष जलज शर्मा, नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. सुनंदा पाटील, आणि अविनाश टिळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी भाऊसाहेब जाधव, महेश पाटील, संदीप ढाकणे आणि इतर सहकारी कार्यरत आहेत. या स्पर्धेसाठी मॅटचे क्रीडांगण तयार करण्याची जबाबदारी मंदार देशमुख आणि उमेश आटवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. तरी नाशिकच्या जास्तीत जास्त क्रीडा प्रेमींनी या स्पर्धेला उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह द्विगुणित करावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभात केले हे आवाहन

Next Post

समृध्दी महामार्गावर नाशिकच्या १३ जणांचा ज्या ट्रव्हल बसच्या अपघातात मृत्यू झाला त्या बसबाबत धक्कादायक माहिती आली समोर

India Darpan

Next Post
IMG 20231015 WA0104 1 e1697339269360 300x261 1

समृध्दी महामार्गावर नाशिकच्या १३ जणांचा ज्या ट्रव्हल बसच्या अपघातात मृत्यू झाला त्या बसबाबत धक्कादायक माहिती आली समोर

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011