इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इस्रायल आणि हमास यांच्यात पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले आहे. पाच दिवसांपासून सुरू असलेली युद्धबंदी संपुष्टात आल्यानंतर पुन्हा एकदा गाझा पट्टीवर बॉम्बचा वर्षाव सुरू झाला. गाझावर नुकत्याच झालेल्या इस्रायलच्या बॉम्बफेकीत सुमारे १७५ पॅलेस्टिनी ठार झाले आहेत.
इस्रायलने पुन्हा एकदा हमासच्या ठिकाणांना लक्ष्य करत हल्ले सुरू केले. युद्धविराम संपल्यानंतर रॉकेट फायरिंग, हवाई हल्ले आणि जमिनीवर चकमक सुरू झाली आहे. इस्रायली सैन्याने हमासवर दक्षिण इस्रायलच्या दिशेने रॉकेट डागल्याचा आरोप केला, त्यानंतर आयडीएफने गाझा पट्टीतील हमासच्या स्थानांवर हवाई हल्ले सुरू केले. यासह गाझामधील लढाईचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. युद्धविराम संपल्यानंतर इस्रायलने गाझावर बॉम्बफेक केली. पॅलेस्टिनी आरोग्य अधिकार्यांचे म्हणणे आहे, की हमाससोबत युद्धविराम संपल्यानंतर गाझावरील इस्रायली बॉम्बफेकीत सुमारे १८० पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. या बॉम्बस्फोटात ५८९ लोक जखमीही झाले होते. हमास आणि पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादचे म्हणणे आहे की त्यांनी दक्षिण आणि मध्य इस्रायलमधील शहरांकडे रॉकेट प्रक्षेपित करणे पुन्हा सुरू केले आहे.
इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे, की हमासने आपल्या भूभागावर रॉकेट डागून सात दिवसांचा युद्धविराम संपवला आहे. इस्रायली सैन्य आता हळूहळू गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील भागाकडे सरकत आहे. हमासच्या दोनशेहून अधिक लक्ष्यांना लक्ष्य केले आहे. लेबनॉनच्या उत्तरेकडील सीमेवर इस्रायल आणि हिजबुल्ला दहशतवाद्यांमध्ये हल्ले सुरू असताना गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी पुन्हा इस्रायलवर रॉकेट डागले. इस्रायल आणि गाझा यांच्यातील हल्ले ५ दिवसांसाठी थांबवण्यात आले आणि हमासने १०० ओलिसांची सुटका केल्याच्या बदल्यात ३०० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्यात आली. इस्रायलचे म्हणणे आहे, की ११५ पुरुष, २० महिला आणि दोन मुले अजूनही हमासच्या ताब्यात आहेत.