मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजचा धक्कादायक अनुभव असे सांगत शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्याची चर्चा आहे.
या व्हिडिओमध्ये मुंबईत सिग्नल्स वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी गाडी अडवून ड्रायव्हरला ऑनलाईन दंड भरण्यास सांगितले. मी स्वतः काय प्रकार आहे याची माहिती घेताना त्या भगिनीने थेट मोबाईलवरील मेसेज दाखवला- प्रत्येक चौकात २५००० रूपयांची वसुली व २० वाहनांवर कारवाई झाली पाहिजे!
मुंबईत ६५२ ट्रॅफिक जंक्शन आहेत. २५,०००×६५२ = १,६३,००,०००/ प्रति दिन म्हणजे फक्त एकट्या मुंबईत तब्बल १.६३ कोटी रुपये.. इतर शहरांचं काय? संबंधित मंत्रीमहोदयांनी वा अधिकाऱ्यांनी खुलासा केल्यास वाहतूक शाखेचा उपयोग वाहतूक नियमनापेक्षा वसुलीसाठी होतोय का याची जनतेला माहिती मिळेल! ट्रिपल इंजिन.. ट्रिपल वसुली??? असे शेवटी म्हटले आहे.