नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दिंडोरीरोडवरील हॉटेल काका ढाबा परिसरात डिपीचा शॉक लागल्याने २८ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रविण देविदास तराळे (रा.निम्नदर्शन सोसा.रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ) असे मृत युवकाचे नाव आहे. दिंडोरीरोडवरील हॉटेल काका ढाबा पाठीमागे शुक्रवारी (दि.१) सायंकाळच्या सुमारास तराळे हा काम करीत असतांना इलेक्ट्रीक डिपीचा शॉक लागल्याने तो बेशुध्द पडला होता.
भाऊ यशवंत तराळे याने त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी उपाचारापूर्वी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास रानडे करीत आहेत.
……..