मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना नेते खा. संजय राऊत मालेगावमध्ये दाखल झाले. मालेगाव न्यायालयात मानहानी दाव्यावर राऊतांच्या जामिनावर आज सुनावणी झाली. त्यानंतर त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला. आता या खटल्याची पुढील तारीख ही ३ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
सुनावणीच्या वेळी न्यायालयाच्या आवारात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे न्यायालयाच्या आवारात छावणीचे स्वरूप आले होते. दुपारी १२ वाजेनंतर ही सुनावणी झाली.
पालकमंत्री दादा भुसे यांनी संजय राऊतांवर मानहानीचा दावा केल्यानंतर राऊत यांनी जामीन अर्ज केला होता. त्यावर ही सुनावणी झाली.
भुसे यांनी केलेल्या मानहानी दाव्यात गेल्या दोन वेळा ते न्यायालयात हजर राहिले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने वॅारंट काढले होते. त्यामुळे आज संजय राऊत हजर झाले. त्यानंतर त्यांना जामीनही मंजुर झाला.